agriculture news in marathi, as death increases scientist Doubt on wuhans corona in Gujrat | Agrowon

गुजरातमध्ये वुहानमधील ‘कोरोना-एल’ विषाणू? मृतांचे प्रमाण अधिक असल्यावरून संशोधकांना संशय

वृत्तसेवा
सोमवार, 27 एप्रिल 2020

चीनमधील वुहान शहरात कोरोनाच्या उद्रेकास कारणीभूत ठरलेल्या कोरोना विषाणूच्या 'एल' या प्रकारचा प्रभाव अधिक असल्याने गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे.

अहमदाबाद : चीनमधील वुहान शहरात कोरोनाच्या उद्रेकास कारणीभूत ठरलेल्या कोरोना विषाणूच्या 'एल' या प्रकारचा प्रभाव अधिक असल्याने गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, गुजरातमध्ये कोरोना विषाणूचे 'एल' आणि 'एस' असे दोन प्रकार संक्रमित झाले आहेत. त्यातील 'एल' हा प्रकार अधिक वेगाने पसरणारा आणि प्रभावशाली आहे. यामुळेच गुजरातमध्ये एकूण रुग्णांच्या तुलनेत मृतांचे प्रमाण अधिक आहे. अर्थात, हा अंदाज असून याबाबत सविस्तर अभ्यास सुरू आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत १३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्य सरकारच्या गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमधील (जीबीआरसी) शास्त्रज्ञ सी. बी. जोशी यांनी सांगितले की, कोरोना विषाणूवर अभ्यास करत असताना तो 'एल' प्रकारचा असल्याचे लक्षात आले. जगभरात जेथे कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे, तिथे कोरोना विषाणूचा हा प्रकार आढळल्याचे स्पष्ट झाले आहे.

वुहानमध्येही हाच कोरोनाचा प्रकार प्रभावी ठरला होता. स्वतःची संख्या वाढविण्याच्या क्षमतेवरून त्याचा प्रकार ठरतो. 'जीबीआरसी'ला कोरोना विषाणूच्या गुणसूत्रांचा अभ्यास करून त्याचे तीन नवीन प्रकार शोधून काढले आहेत. ज्या कोरोनाबाधिताच्या शरीरातून या ठिकाणी चाचणीसाठी रक्त घेतले होते तो आता बरा झाला असल्याचेही जोशी यांनी सांगितले. 'एल' प्रकारचा कोरोना विषाणू आढळला असला तरी गुजरातमधील किती रुग्णांमध्ये या प्रकारचा विषाणू आहे, याचा अभ्यास झालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एल प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रभाव अधिक असल्यामुळे गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असू शकते.
- अतुल पटेल, साथरोग तज्ज्ञ 


इतर ताज्या घडामोडी
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...
जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...