नगरमध्ये ग्रामस्थांच्या प्रतिहल्ल्यात बिबट्याचा मृत्यू

नगरमध्ये ग्रामस्थांच्या प्रतिहल्ल्यात बिबट्याचा मृत्यू
नगरमध्ये ग्रामस्थांच्या प्रतिहल्ल्यात बिबट्याचा मृत्यू

नगर ः नगर-पुणे महामार्गालगत कामरगाव येथे आज दुपारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर याच बिबट्याने सायंकाळी पाचच्या सुमारास आणखी एकावर हल्ला केला. त्या वेळी ग्रामस्थांनी प्रतिकार केला असता, त्यांच्या मारहाणीत बिबट्याचा मृत्यू झाला. शालिनी सुरेश ठोकळ (वय ३२) व तानाजी माळी (वय ५५), अशी जखमींची नावे असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, सायंकाळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. 

नगर-पुणे महामार्गावरील कामरगाव येथील ठोकळ वस्ती परिसरात शालिनी ठोकळ व रोहिणी संतोष कदम शेतात जात असताना समोरून आलेल्या बिबट्याने शालिनी यांच्यावर झेप घेत त्यांच्या पाठीला व मानेला चावा घेतला. त्या वेळी रोहिणी यांनी बिबट्यावर दगड भिरकावला. तो तोंडावर लागल्याने बिबट्या शेजारच्या ज्वारीच्या शेतात पळाला. नंतर तेथे दोन बछडे आढळून आले. शालिनी यांना तातडीने रुग्णालयात पाठविले.

सरपंच सीमा साठे यांचे पती गणेश साठे यांनी वनपरिक्षेत्रपाल भास्कर शिंदे यांना घटनेविषयी कळविले. सायंकाळी पाचच्या सुमारास या बिबट्याने पवारवाडी येथून आलेल्या तानाजी माळी यांच्यावर हल्ला केला. त्यात माळी गंभीर जखमी झाले. गणेश साठे यांच्या मदतीने तरुणांनी त्यांनाही तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, बिबट्याशी ग्रामस्थांची मोठी झटापट झाली. त्यात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com