Agriculture news in marathi Debate erupts over 'Swabhimani' getting a place in Legislative Council elections | Agrowon

विधान परिषद निवडणुकीत ‘स्वाभिमानी’ला स्थान मिळण्यावरून चर्चांना उधाण 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 मे 2020

बुलडाणा ः राज्यात नऊ जागांसाठी २१ मे रोजी होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत सत्तारुढ आघाडीकडून स्वाभिमानीला एखाद्या जागेची संधी दिली जाते काय, याबाबत पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने बुलडाण्यात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीबाबत तर्कवितर्क व्यक्त होऊ लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळी आघाडीकडून त्यांना परिषदेच्या जागेबाबत आश्‍वासन दिल्याचे समर्थक सांगत आहेत. 

बुलडाणा ः राज्यात नऊ जागांसाठी २१ मे रोजी होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत सत्तारुढ आघाडीकडून स्वाभिमानीला एखाद्या जागेची संधी दिली जाते काय, याबाबत पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने बुलडाण्यात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीबाबत तर्कवितर्क व्यक्त होऊ लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळी आघाडीकडून त्यांना परिषदेच्या जागेबाबत आश्‍वासन दिल्याचे समर्थक सांगत आहेत. 

स्वाभिमानीचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी विद्यमान आघाडीचे समन्वयक व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आगामी निवडणुकीत स्वाभिमानीला जागा देण्याबाबत पत्र दिल्याची माहिती आहे. आघाडीने आपला घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानीला जागा दिली तर त्याठिकाणी कोणाची वर्णी लागेल याबाबत चर्चा होत आहेत. त्यात रविकांत तुपकर यांचे नाव आघाडीवर आहे. 

मागील लोकसभा निवडणुकीच्यावेळी तुपकरांची संधी आघाडीच्या उमेदवारासाठी चुकविण्यात आली होती. त्यांना पुढील काळात योग्यवेळी संधी दिली जाईल, असा शब्द देण्यात आल्याचे आता समर्थक सांगत आहेत. त्यामुळेच आता परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तुपकरांच्या उमेदवारीबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त होऊ लागले. 

रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानीसाठी विदर्भ-मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक बांधणीचे काम केले आहे. विदर्भात अमरावती जिल्‍ह्यात स्वाभिमानीच्या उमेदवाराने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खातेही उघडले आहे. आघाडीच्या उमेवादारांचा स्वाभिमानीच्या नेत्यांनी ठिकठिकाणी प्रचार केला. असे असूनही आघाडीने घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानीला मंत्रीमंडळात संधी दिलेली नाही. आता छोट्या पक्षांना स्थान दिल्या गेल्यास स्वाभिमानीचा विचार केल्या जाईल का हाही प्रश्‍न आहे. 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...