कर्जमुक्तीत रत्नागिरी जिल्ह्यातील २३४ शेतकऱ्यांचा समावेश

Debt-free list includes 4 farmers in Ratnagiri district
Debt-free list includes 4 farmers in Ratnagiri district

रत्नागिरी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील गावांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात राजापूर तालुक्यातील आजिवली, चिपळूणमधील वहाळ या दोन गावांचा समावेश आहे. त्या दोन गावांमध्ये २३४ शेतकरी असून यातील १०६ शेतकऱ्यांचे सायंकाळपर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार घेतल्यानंतर काही दिवसांमध्येच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी योजना जाहीर केली. त्यामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. पहिल्या सर्व्हेक्षणात जिल्ह्यात १८,६२८ शेतकरी निकषानुसार पात्र ठरलेले होते. त्यामध्ये १२,८९१ जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तर ५,७३७ शेतकऱ्यांनी इतर बँकांमधून कर्जप्रकरणे केलेली आहेत. जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांना ३० कोटी ७८ लाखांची कर्जमाफी मिळणार असून इतर बँकेतील लाभार्थ्यांना ४९ कोटी ८२ लाख रुपयांचे कर्ज माफ होतील.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर राज्य सरकारकडून पहिली यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करताना सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश केलेला असून, पहिल्या यादीत ६८ गावातील १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावे आहेत. राज्य सरकारने कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यापूर्वी ३४ लाख ८३ हजार ९०८ खात्यांची माहिती संग्रहित केली आहे. एप्रिल अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com