सोलापुरात कर्जमाफी, पीकविम्याप्रश्‍नी ‘प्रहार’चे जेल भरो

सोलापुरात कर्जमाफी, पीकविम्याप्रश्‍नी ‘प्रहार’चे जेल भरो
सोलापुरात कर्जमाफी, पीकविम्याप्रश्‍नी ‘प्रहार’चे जेल भरो

सोलापूर : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याची घोषणा केली. परंतु, अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून कोसो दूर राहावे लागले आहे. शासन मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली म्हणून मोठमोठी भाषणे देऊन फसवणूक करीत आहे. पीकविम्याच्या प्रश्‍नावरही सरकार गंभीर नाही, या दोन्ही प्रश्‍ंनाकडे लक्ष वेधण्यासाठी ‘प्रहार’ संघटनेने बुधवारी (ता. ३१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन केले. 

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख दत्तात्रय मस्के पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. 

मस्के पाटील म्हणाले, ‘‘राज्यातील शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी अर्धवट आहे. जर प्रत्यक्षात संपूर्ण कर्जमाफी मिळाली, असती तर शेतकरी राजा सुखी असता. परंतु, सरकारचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. शेतकरी प्रचंड अडचणीत असताना कर्जमाफी केल्याची फुशारकी सरकार मारत आहे. आता येणाऱ्या निवडणुकीत त्याचे  भांडवल करून मते मिळवून पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण, आम्ही तो हाणून पाडू. पीकविम्याच्या प्रश्‍नावर वेळकाढूपणा सरकार करते आहे. याबाबत कोणतेच गांभीर्य सरकारला नाही.’’

पक्षाचे शहरप्रमुख अजित कुलकर्णी यांनीही या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय ‘प्रहार’ स्वस्थ बसणार नाही, असे म्हणाले.

शहर संपर्कप्रमुख जमीर शेख यांचेही या वेळी भाषण झाले. निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांना संघटनेने मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात कार्याध्यक्ष खालीद मनियार, मुश्‍ताक सभा, आबा आदलिंगे, अमोल पाटील, राज चव्हाण, शिकार होकरी, माजीद पटेल, ताज बागवान, सोपन वणगुरकर, संभाजी मारे, इब्राहिम जमादार, प्रणव शेंडे, सचिन गायकवाड आदी सहभागी झाले होते.

या आहेत मागण्या...

  •   शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी.  
  •   पेरणी ते कापणीपर्यंत कामांचा समावेश     मनरेगाअंतर्गत करावा.
  •   दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करावे.
  •   ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावे.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com