उस्मानाबादेतील कर्जमुक्तीच्या याद्या २८पर्यंत उपलब्ध होणार

The debt relief lists in Osmanabad will be available until February 28
The debt relief lists in Osmanabad will be available until February 28

उस्मानाबाद : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी आणि भूम तालुक्यातील पाथरूड येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करून या योजनेचा प्रारंभ जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते सोमवारी (ता. २४) करण्यात आला. जिल्ह्यातील ७६ हजार ४३७ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत उपलब्ध होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी व्यक्त केला.

तामलवाडी येथील तामलवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी येथे आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख, तहसीलदार सौदागर तांदळे, सहायक निबंधक विद्याधर माने, तामलवाडी गावचे सरपंच ज्ञानेश्वर माळी, उपसरपंच दत्तात्रय वडणे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शिंदे, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक मल्लिकार्जुन मसुते, उपाध्यक्ष नानासाहेब पाटील, संचालक शिवदास पाटील, सुलेमान शेख, बलभीम व्हटकर, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब पाटील, ज्येष्ठ तपासणीस, जिल्हा मध्यवर्ती बँक पारवे, तलाठी श्री. शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी श्री. इंगळे, तामलवाडी सहकारी सोसायटीचे गटसचिव सुधाकर लोंढे उपस्थित होते. 

तामलवाडी आणि पाथरूड या दोन गावांतील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या आहेत. तामलवाडी येथील २०२; तर पाथरूड येथील ११० पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून, त्यांचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. या याद्यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर लगेचच सुधारणा केली जाईल, असे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी स्पष्ट केले. 

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहू नयेत हा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील ७६ हजार ४३७ थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास अंदाजित ७७७ कोटी रुपयांची कर्जमाफी होऊन हे शेतकरी कर्जमुक्त होतील. या सर्व शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली असून २८ तारखेपर्यंत याद्या उपलब्ध होतील, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com