Agriculture news in marathi Debt repayment should be extended | Page 2 ||| Agrowon

कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 एप्रिल 2021

कोरोना लॉकडाउनमुळे आर्थिक बाजू कमकुवत झाली असल्याने अनेक शेतकऱ्यांना हे शक्‍य झाले नाही. परिणामी, कर्ज परतफेडीची मुदत ३१ जूनपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गोंदिया ः गेल्या हंगामात देण्यात आलेल्या कर्जाच्या परतफेडीकरिता ३१ मार्चपर्यंतची मुदत होती. परंतु कोरोना लॉकडाउनमुळे आर्थिक बाजू कमकुवत झाली असल्याने अनेक शेतकऱ्यांना हे शक्‍य झाले नाही. परिणामी, कर्ज परतफेडीची मुदत ३१ जूनपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांना खरीप हंगामात धानाची लागवड, बियाणे, खते यासाठी सेवा सहकारी संस्थेमार्फत तीन लाखांच्या मर्यादेत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तिरो तालुक्‍यात ६७ सेवा सहकारी सोसायटी आहेत. त्यांच्या माध्यमातून तालुक्‍यातील जवळपास ३५०० शेतकऱ्यांना २०२०-२१ या वर्षात कर्जवाटप करण्यात आले. 

खरीप हंगामातील धानाची विक्री करुन ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड शेतकरी सेवा सोसायटीला करतात किंवा तसा नियम देखील आहे. या वर्षी मात्र धानावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यासोबतच खरीप हंगामातील धानाचा उतारा देखील कमी आला. त्यातच शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर धानाची विक्री केली. त्याचे चुकारे देखील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झाले नाही. 

त्यामुळे कर्जाची परतफेड करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्ज परतफेडीची मुदत ३१ जूनपर्यंत वाढवावी, अशी मागणी त्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आली आहे. अन्यथा, या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांसह जनमानस संघटनेने दिला आहे.  


इतर अॅग्रो विशेष
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...
भुईमूग खर्चालाही महागअकोला ः उन्हाळी हंगामात यंदा लागवड केलेल्या...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
जोरदार पावसाची शक्यता पुणे : मराठवाडा ते मध्य प्रदेशचा मध्य भाग या...
बाजार समित्याबंदमुळे खरीप नियोजन ‘...पुणे: कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन...
शेततळे अनुदानाचे वीस कोटी वितरित नगर ः राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल...
साखर कारखान्यांकडून ९२ टक्के ‘एफआरपी’...कोल्हापूर : राज्यात एप्रिलअखेर एकूण रकमेच्या ९२...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत पुणे : राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
मॉन्सून यंदा वेळेवर पुणे : सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक...
शेतकऱ्यांकडे २९ लाख क्विंटल घरचे बियाणे पुणे ः कृषी विभागाने ग्रामबिजोत्पादन मोहिमेतून...
मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत...
पावसाचा प्रभाव वाढणार पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची...
राज्यातील पाणीसाठा ४४ टक्क्यांवर पुणे ः राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला...