परभणी जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी

परभणी जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी
परभणी जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी

परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या दहाव्या आणि अकराव्या ग्रीन लिस्टमध्ये समाविष्ट जिल्ह्यातील ८ हजार ७५८ शेतकऱ्यांना ७८ कोटी ५९ लाख रुपये एवढी कर्जमाफी मिळाली. त्यामुळे आजवर प्राप्त झालेल्या दहा ग्रीन लिस्टनुसार जिल्ह्यातील एकूण १ लाख ५० हजार १२१ शेतकऱ्यांना ८७९ कोटी ३७ लाख १५ हजार ४२० रुपये एवढ्या रकमेची कर्जमाफी मिळाली. या संदर्भात जिल्हा अग्रणी बॅंकेच्या सूत्रांनी माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७०३ ग्रामपंचायतीअंतर्गतच्या ७७४ गावांतील ३ लाख ६५ हजार ३२७ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज केले आहेत. नोव्हेंबर अखेरपर्यंत १ ते ११ ग्रीन लिस्टपैकी आठवी लिस्ट वगळता एकूण १० लिस्ट प्राप्त झाल्या आहेत. दहाव्या आणि अकराव्या ग्रीन लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या एकूण ८ हजार ५७८ शेतकऱ्यांचा ७८ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ५० हजार १२१ इतकी झाली आहे.मंगळवारी (ता. २७) अखेरपर्यंत १ लाख ४५ हजार ३६० शेतकऱ्यांच्या खात्यावर ८२२ कोटी ३१ लाख ५ हजार ३१८ रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे. अद्याप ४ हजार ७६१ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५७ कोटी ६ लाख १० हजार १०२ रुपये एवढी रक्कम जमा करणे बाकी आहे.

आजवर कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांचे १ लाख ४ हजार १४३ शेतकऱ्यांना ७२९ कोटी १२ लाख ४० हजार १३ रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या १८ हजार ७४६ शेतकऱ्यांना १११ कोटी २३ लाख ९६ हजार ९५७ रुपये, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या २७ हजार २३२ शेतकऱ्यांना ३९ कोटी ७८ लाख ४५० रुपये एवढी कर्जमाफी मिळाली.

राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये भारतीय स्टेट बॅंकेच्या ८० हजार ४९८ शेतकऱ्यांना ५८६ कोटी ४० लाख २ हजार २२८ रुपये, आलाहाबाद बॅंकेच्या २ हजार ३०१ शेतकऱ्यांना १६ कोटी १८ लाख ५५ हजार ९०६ रुपये, आंध्रा बॅंकेच्या १ हजार २८१ शेतकऱ्यांना ५ कोटी २३ लाख ३३ रुपये, बॅंक आॅफ बडोदाच्या १ हजार ७५४ शेतकऱ्यांना ११ कोटी ९२ लाख ६६ हजार ६४३ रुपये, बॅंक आॅफ इंडियाच्या १ हजार ७०२ शेतकऱ्यांना ११ कोटी ६२ लाख ७१ हजार ४३६ रुपये, बॅंक आॅफ महाराष्ट्राच्या ९ हजार ३९९ शेतकऱ्यांना ५१ कोटी ५ लाख ४७ हजार ४५५ रुपये, कॅनरा बॅंकेच्या ९४२ शेतकऱ्यांना ८ कोटी ३ लाख ४४ हजार ४८१ रुपये, सेंट्रल बॅंक आॅफ इंडियाच्या ६२२ शेतकऱ्यांना ३ कोटी ८० लाख ६ हजार १७९ रुपये, देना बॅंकेच्या २ हजार २१० शेतकऱ्यांना १४ कोटी ९१ लाख १६ जार ५९२ रुपये, आयडीबीआय बॅंकेच्या ३४४ शेतक-यांना १ कोटी ५४ लाख ४२ हजार ८०५ रुपये, इंडियन ओवरसीज बॅंकेच्या ३३८ शेतकऱ्यांना १ कोटी ९९ लाख ९९ हजार २३५ रुपये, पंजाब नॅशनल बॅंकेच्या १५१ शेतकऱ्यांना ८४ लाख ४ हजार ८५७ रुपये, सिंडीकेट बॅंकेच्या २७९ शेतकऱ्यांना १ कोटी ७८ लाख ६० हजार ७४८ रुपये, युको बॅंकेच्या १ हजार ३८० शेतकऱ्यांना ६ कोटी ३७ लाख ४७ हजार ५२१ रुपये, युनियन बॅंकेच्या ९२९ शेतकऱ्यांना ६ कोटी ५९ लाख १४ हजार ७९७ रुपये, विजया बॅंकेच्या १ शेतकऱ्यांना ८४ हजार ७४८ रुपये, आयसीआयसीआय बॅंकेच्या १२ शेतकऱ्यांना ५ लाख १ हजार १३७ रुपये यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com