पुणे : खेडमध्ये साडेतेरा हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

Debt waiver benefits to the farmers in the Khed taluka
Debt waiver benefits to the farmers in the Khed taluka

पुणे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत खेड तालुक्यातील १३ हजार ४९३ थकीत खातेदारांना ७५ कोटी ९ लाख ५ हजार ३६९ रुपयांची कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्या संदर्भात शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण पत्राचे वाटप करण्यात येत आहे.

खेड तालुक्यात देण्यात आलेल्या कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पत्राचे वाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते राजगुरुनगर येथे बॅंकेच्या सभागृहात रविवारी (ता. १) करण्यात आले. 

या वेळी सहायक निबंधक श्रीकांत श्रीखंडे, जिल्हा बॅंकेचे विभागीय अधिकारी विलास भास्कर, वसुली अधिकारी तान्हाजी दौंडकर, बॅंक व्यवस्थापक चंद्रकांत कांबळे, दत्तात्रय सावंत आदीसह लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

सरकारने दुसऱ्या टप्प्यातील कर्ज खात्यांची कर्जमाफी गावनिहाय यादी जाहीर केली आहे. खेड तालुक्यात एक एप्रिल २०१५ ते ३१ सप्टेंबर २०१९ पर्यतच्या पीककर्ज थकीत शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. खेड तालुक्यातील १८९ गावांतील १०४ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून १० हजार ९४० शेतकऱ्यांची खरिपासाठी आणि रब्बी पीककर्ज १४ हजार २७० शेतकऱ्यांची बॅंक कर्ज खाते थकीत होती. 

या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी पात्र धरण्यात आले होते. त्यासाठी संबंधित बॅंकेच्या माध्यमातून कर्ज खात्याला कर्जदार शेतकऱ्यांचे आधारकार्ड लिंक करण्यात आले होते. तालुक्यातील ५४ शेतकऱ्यांचे आधारकार्ड लिंकिंग होत नसली तरी संबधित शेतकऱ्यांनी तहसीलदार सुत्रित्रा आमले यांच्याकडून आधार प्रमाणीकरण पत्र घेतल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

खेड तालुक्यात कर्जमाफीचा लाभास पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी गावामध्ये सोसायटी, ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

कोणत्याही बॅंकेत प्रमाणीकरण करता येणार कर्जमाफी लाभार्थी शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ज्या बॅंकेत कर्जमाफीचे कर्ज खाते आहे. त्याच बॅंकेत करणे अपेक्षित नसून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील आपल्या नावासमोरचा कोड नंबर घेऊन कोणत्याही राष्ट्रीयीकृत बॅंकेत करता येणार आहे. तसेच ई-महासेवा केंद्रातून मोफत आधार प्रमाणीकरण करून दिले जाणार आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी कोणाला पैसे देऊ नये, अथवा कोणी मागत असल्यास त्याची तक्रार करावी, असे आवाहन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com