सांगलीत कर्जमुक्तीच्या याद्या २१ फेब्रुवारीपासून

Debt waiver lists in Sangli from 21st February
Debt waiver lists in Sangli from 21st February

सांगली : ‘‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी लवकरच होत आहे. ८९ हजार ९५८ कर्जदार शेतकऱ्यांना ५२८ कोटी रुपयांचा लाभ मिळण्याची शक्‍यता आहे. बॅंकांकडून कर्जदारांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. त्या २१ फेब्रुवारीपासून गावांत प्रसिद्ध केल्या जातील,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

साडेतीन हजार शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग झाले नसून त्याच्या तत्काळ कार्यवाहीचे आदेश बॅंकाना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. चौधरी म्हणाले, ‘‘एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल घेतलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यांत अल्पमुदत पीककर्जाची ३० सप्टेंबर २०१९ रोजी मुद्दल व व्याजासह थकीत, परतफेड न झालेली रक्कम २ लाखांपर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. एखाद्या शेतकऱ्यांचे दोन बॅंकात कर्ज आहे. मात्र ती रक्कम दोन लाखांच्या आतील आहे, त्यांनाही कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळेल.’’

‘‘कर्जमुक्ती योजनेसाठी कर्जदारांच्या याद्या अपलोड करण्याचे काम १ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. ८९ हजार ९५८ कर्जदार शेतकऱ्यांची यादी अपलोड करावी लागेल. ८६ हजार १२१ कर्जदारांच्या यादी अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले. अवघ्या ३ हजार ८३७ शेतकऱ्यांची यादी प्रलंबित आहे. बुधवारपर्यंत ती पूर्ण होईल. याद्या २१ फेब्रुवारीपासून गावागावांत चावडी किंवा ग्रामपंचायतीच्या फलकावर प्रसिद्ध करण्यात येतील. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि राष्ट्रीयीकृत बॅंकातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात त्रुटी आहेत. काही शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग झालेले नाही. त्यांचे तात्काळी आधार जोडणी करून घ्यावी, अशा सूचना बॅंकांना देण्यात आल्या आहेत.’’ 

यादीत नाव नसल्यास तहसीलदारांकडे अर्ज करा  दोन लाखांपर्यंतच्या थकीत कर्जासाठी शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहे, मात्र यादीत नाव नसल्यास त्यांनी तहसीलदारांकडे अर्ज करावा, असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले. ज्यांना कर्जमाफीचा लाभ नको, त्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे रीतसर अर्ज करावा. त्याची पडताळणी समितीकडून केली जाईल. 

पोर्टलवर अपलोड खातेस्थिती

बॅंक  पात्र कर्ज खाती कर्जाची रक्कम पोर्टलवर अपलोड संख्या अपलोड न झालेली संख्या
जिल्हा बॅंक ७५१३१  ४००.२३ कोटी ७२८५८  २२७३
राष्ट्रीयीकृत व इतर बॅंका  १४८२७ १२८.५२ कोटी १३२६३   १५६४
एकूण  ८९९५८  ५२८.७५ कोटी ८६१२१  ३८३७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com