agriculture news in marathi, Debt waiver stuck in the problem of verification | Agrowon

पडताळणीच्या चक्रात अडकली कर्जमाफी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

अकोला ः शासनाच्या कर्जमाफी योजनेचा अकोला आणि वाशीम जिल्ह्यांत मिळून १३३ लाभार्थ्यांना आतापर्यंत फायदा झाला असून, उर्वरित हजारो शेतकरी अद्यापही ‘कधी मिळते कर्जमाफी’ अशी विचारणा करीत अाहेत. याद्यांच्या पडताळणीतील गोंधळ अद्यापही मिटलेला नसल्याने शेतकरी अद्याप वेटिंगवर अाहेत.

राज्य शासनाने जून २०१७ मध्ये कर्जमाफी जाहीर केली. यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली असून, अकोला जिल्ह्यात एक लाख ९१ हजार १८७ शेतकरी पात्र ठरले अाहेत. यात जिल्हा बँकेचे एक लाख १२ हजार ४०६ खातेदार, तर ७८ हजार ७८१ हे राष्ट्रीयीकृत बँकांचे खातेदार अाहेत.

अकोला ः शासनाच्या कर्जमाफी योजनेचा अकोला आणि वाशीम जिल्ह्यांत मिळून १३३ लाभार्थ्यांना आतापर्यंत फायदा झाला असून, उर्वरित हजारो शेतकरी अद्यापही ‘कधी मिळते कर्जमाफी’ अशी विचारणा करीत अाहेत. याद्यांच्या पडताळणीतील गोंधळ अद्यापही मिटलेला नसल्याने शेतकरी अद्याप वेटिंगवर अाहेत.

राज्य शासनाने जून २०१७ मध्ये कर्जमाफी जाहीर केली. यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली असून, अकोला जिल्ह्यात एक लाख ९१ हजार १८७ शेतकरी पात्र ठरले अाहेत. यात जिल्हा बँकेचे एक लाख १२ हजार ४०६ खातेदार, तर ७८ हजार ७८१ हे राष्ट्रीयीकृत बँकांचे खातेदार अाहेत.

अकोला अाणि वाशीम जिल्ह्यांत असलेल्या ८३५ सेवा सहकारी सोसायट्यांचा डाटा सरकारच्या पोर्टलवर अपलोडसुद्धा झाला अाहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांचे काम अद्यापही गतिशील झालेले नाही. अपलोड झालेल्या याद्यांमधील नावांना विविध निकष लावून तपासणी केली जाईल. त्यानंतर अंतिम पात्र शेतकरी निवडले जाणार अाहेत.

वास्तविक अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांची यादी चावडीवर वाचण्यात अाली. चावडीवाचनाच्या माध्यमातून अचूक ठरणाऱ्या अर्जांची पडताळणी व किरकोळ दुरुस्त्या केल्यानंतर ही यादी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. पुन्हा शासन स्तरावरही या यादीला चाळणी लावली गेली. सरकारने ‘दिवाळी’चा मुहूर्त साधून शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानही केला. सन्मानित केलेल्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी यादीची पडताळणी केली असता अपात्र ठरले. हा सगळा गोंधळ अद्यापही संपलेला नाही. गावागावांत सध्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरच चर्चा झडताना दिसतात.

‘अापले सरकार’नंतर अाता महा-अाॅनलाइनही
कर्जमाफीच्या याद्या ‘अापले सरकार’ या पोर्टलवर अपलोड करण्याचे अादेश यंत्रणांना देण्यात अाले होते. त्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून काम सुरू अाहे. अद्याप एकाही जिल्ह्याचे १०० टक्के काम झालेले नाही. अाता ‘अापले सरकार’एेवजी महा-अाॅनलाइवरसुद्धा याद्या अपलोड करण्याचे अादेश धडकले अाहेत. त्यानुसार पुन्हा अाता नव्याने या पोर्टलवर याद्या अपलोड करण्याचे काम सुरू झाले अाहे. ही तांत्रिकदृष्ट्या सोय असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र या नवीन अादेशवजा फेरबदलाबाबत कुणीही अधिकृत बोलायला तयार नाही.

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...