agriculture news in Marathi, deceit of grapes producers by 3 crores form traders,Maharashtra | Agrowon

व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन कोटींची फसवणूक

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जुलै 2019

नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या द्राक्ष निर्यातदार कंपनीने निफाड, दिंडोरी, इगतपुरी व चांदवड तालुक्यांतील शेतकऱ्यांचे २ कोटी ९१ लाख रुपये द्राक्षाच्या खरेदीपोटी थकविले आहेत. अनेकदा मागणी करूनही पैसे दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली. मात्र, त्यानंतरही पैसे न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारपासून (ता. २०) कंपनीच्या संचालकाच्या घरावर मोर्चा काढून ‘‘पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही घरासमोरून हलणार नाही,’’ असा पवित्रा घेत तेथेच ठाण मांडून आहेत.  

नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या द्राक्ष निर्यातदार कंपनीने निफाड, दिंडोरी, इगतपुरी व चांदवड तालुक्यांतील शेतकऱ्यांचे २ कोटी ९१ लाख रुपये द्राक्षाच्या खरेदीपोटी थकविले आहेत. अनेकदा मागणी करूनही पैसे दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली. मात्र, त्यानंतरही पैसे न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारपासून (ता. २०) कंपनीच्या संचालकाच्या घरावर मोर्चा काढून ‘‘पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही घरासमोरून हलणार नाही,’’ असा पवित्रा घेत तेथेच ठाण मांडून आहेत.  

२०१८-१९ च्या हंगामात एकूण ८७ शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या कंपनीला दिला होता. संतोष बबन गवळी (रा. शिवाजीनगर, ओझर), नीलेश बाळासाहेब दवांगे (रा. खेडगाव), पंकज माधव मोहन (रा. ओझर) हे या संबंधित निर्यात कंपनीचे संचालक असून त्यांनी शेतकऱ्यांची द्राक्षे निर्यात केली. द्राक्ष खरेदीपोटी त्यांनी शेतकऱ्यांना पुढील एक महिना मुदतीचे धनादेश दिले. मात्र ते दोन, तीन वेळा भरूनही वठलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी संतोष गवळी यांच्या घरी वेळोवेळी भेटी घेतल्या. त्या वेळी देतो, अजून माझे व्यवहाराचे पैसे मिळाले नाहीत, आल्यावर देईल अशी कारणे सांगितली. मात्र आता चालू हंगामाच्या तयारीसाठी पैसे गरजेचे असल्याने याबाबत पोलिसात तक्रार दिली दिली, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.

पोलिसात तक्रार देऊनही पैसे मिळाले नसल्याने शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गवळी यांच्या घरासमोर सोबत शिदोरी घेऊन शेतकऱ्यांनी शनिवारपासून ठिय्या सुरू केला आहे. या प्रकरणी नाशिक जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक आरती सिंग, खासदार भारती पवार, निफाडचे आमदार अनिल कदम यांना याआधी शेतकऱ्यांनी निवेदन दिलेले आहे. ओझर पोलीस स्टेशनमध्ये आदित्य एक्स्पोर्टच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हाही दाखल झाला आहे.

मात्र या ठिकाणी कोणीही येऊन दखल घेतलेली नाही. 
या ठिय्यामध्ये रोहित जाधव (पालखेड), बाळासाहेब गायकवाड (पालखेड), रमेश खैरे (पिंपळगाव बसवंत), विनोद पाटील (जऊळके वणी), नंदू मते (साकोरे मिग), आनंद गायकवाड (जिव्हाळे), अनिल जाधव (सोनजांब), राजाभाऊ परदेशी, रमेश कुयटे, सत्यजित भालेराव, भगवंत धुमाळ, बाळासाहेब राजगुरू, अनिल कोठुळे आदींचा आंदोलनकर्त्यांत सहभाग आहे.


इतर अॅग्रो विशेष
कोल्हापूर जिल्ह्यात एकरकमी एफआरपी...कोल्हापूर : नव्या सरकारकडून कर्जमाफीची शक्यता...
हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभनागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला...
कापूस वेचणी यंत्राचा पर्याय कधी मिळणार...अमरावती ः राज्यात कापसाचे सरासरी सुमारे ४० लाख...
...आता बटाट्याचीही टंचाईकोल्हापूर: कांद्यापाठोपाठ आता बाजारपेठांमध्ये...
कर्जमाफीची `कट ऑफ डेट` ३१ ऑगस्ट ठेवासोलापूर : युती सरकारने दीड लाखाची कर्जमाफी देऊनही...
गारठ्यात हळूहळू वाढपुणे  ः कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात...
गरजेनुसार दर्जेदार शेतीयंत्रांची...जोगवडी (ता. बारामती, जि. पुणे) येथील राजेभोसले...
सोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेतनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
`उज्ज्वला` योजनेत मोठा भ्रष्टाचारनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी...
गारठा पुन्हा वाढणारपुणे  ः राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून...
पूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळपुणे  ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन...
नाशिक जिल्ह्यात द्राक्षमणी पोखरणाऱ्या...नाशिक  : जिल्ह्यात द्राक्ष पीक फुलोरा व मणी...
मराठवाड्यातील ५५ प्रकल्प कोरडेचऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळाने...
पंजाबचे पशुपालक वापरतात सुधारित तंत्रलुधियाना (पंजाब) येथे प्रोग्रेसिव्ह डेअरी...
शेती, दुग्धव्यवसायाने बनविले...कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी)...
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...