agriculture news in marathi decentralisation of vegetable market need to avoid crowd | Agrowon

गर्दी टाळण्यासाठी शेतमाल विक्रीच्या विकेंद्रिकरणाची गरज

गणेश कोरे
मंगळवार, 24 मार्च 2020

गर्दी टाळण्यासाठी भाजीपाल्याची विक्री बाजार समित्यांमध्येच केंद्रीत न करता, शहरे आणि उपनगरांच्या विविध भागात विकेंद्रिकरण करत शेतमालाच्या थेट विक्रीचे नियोजन करणे गरजेचे आहे. यामुळे गर्दीचे देखील विकेंद्रिकरण करुन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्घवणार नाही.

पुणे : कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचार बंदीच्या काळात जिवनावश्‍यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र जिवनावश्‍यक वस्तुंमधील भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे चित्र आज (ता.२४) राज्याने पाहिले. गर्दी टाळण्यासाठी भाजीपाल्याची विक्री बाजार समित्यांमध्येच केंद्रीत न करता, शहरे आणि उपनगरांच्या विविध भागात विकेंद्रिकरण करत शेतमालाच्या थेट विक्रीचे नियोजन करणे गरजेचे आहे. यामुळे गर्दीचे देखील विकेंद्रिकरण करुन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्घवणार नाही, असे मत व्यक्त होत आहे. 

सध्या भाजीपाल्याच्या विक्रीची व्यवस्था ही बाजार समित्यांमध्ये केंद्रीत आहे. साथीच्या रोगांच्या फैलाव रोखण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी हि अनिश्‍चित काळासाठी असताना, शहरातील भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची बाजार समितीमधील आणि परिसरात गर्दी टाळण्यासाठी शहरे आणि उपनगरांच्या विविध भागात मैदाने, शाळा या परिसरात भाजीपाला विक्रीसाठी पाठविण्याची व्यवस्था करणे आता आवश्यक झाले आहे. बाजार समितीमध्ये शेतमालाची सर्व वाहने न आणता शहराच्या विविध भागात विविध भाजीपाल्याची दोन-चार ट्रक पाठवुन विक्री करण्याची व्यवस्था केल्या गर्दी नियंत्रणावर फायदा होईल, असे मत व्यक्त होत आहे. 

पुणे शहरात गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.२४) सुमारे ५०० ट्रक भाजीपाल्यासह कांदा बटाटा आणि फळांची आवक झाली होती. यावेळी मोठ्याप्रमाणावर गर्दी झाल्याने ग्राहकांना खरेदीसाठी रांगेने सोडण्याची वेळ बाजार समिती प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर आली.

कोरोनाचा प्रभावाचा अंदाज नसल्याने राज्यात आणखी काही दिवस राहणार असल्याच्या शक्यतेने दोन दिवसांआड बाजार समितीमध्ये येणारी शेतमालाची वाहने पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस ग्राऊंड, हडपसर येथील एसआरपीएफचे ग्राऊंड, सिंचननगर (रेंजहिल्स) येथील कृषी महाविद्यालयाचे पटांगण, महानगरपालीकांच्या भाजी मंडई, शहरातील विविध शाळांचा परिसर आदि ठिकाणी दोन-दोन, चार-चार संख्यने पाठविण्यास प्राधान्य दिल्यास नियोजना उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त केले गेले. मात्र, यासाठी पणन मंडळ, पोलीस, बाजार समिती, महानगरपालीका, नगरसेवक, वॉर्ड आॅफिसर यांच्या समन्वयाने शहरातील भाजीपाला पुरवठा सुरळीत करणे शक्य होणार आहे. 
 
 


इतर अॅग्रो विशेष
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका...नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या...
विदर्भात टोळधाडीची अस्तित्व कायमनागपूर : कृषी विभागाकडून टोळधाड नियंत्रणासाठी...
राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे...
राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत...
शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू...बुलडाणा ः या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त...
राज्यात बेदाण्याचे सव्वा दोन लाख टन...सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना...
मॉन्सूनची आणखी प्रगती शक्यपुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल...
राज्यात ५८२० पाणी वापर सोसायट्या स्थापन...पुणे  : राज्यातील विविध धरणांच्या क्षेत्रात...
राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीचा राजस्थानमधील ९० हजार हेक्टरला...जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील...
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...