टॅंकर, चारा छावण्यांबाबत आचारसंहितेपूर्वी निर्णय घ्या ः अजित पवार

टॅंकर, चारा छावण्यांबाबत आचारसंहितेपूर्वी निर्णय घ्या ः अजित पवार
टॅंकर, चारा छावण्यांबाबत आचारसंहितेपूर्वी निर्णय घ्या ः अजित पवार

पुणे : जिल्ह्याच्या काही तालुक्यांत पाणी आणि चाराटंचाईची स्थिती कायम आहे. ३० सप्टेंबरपर्यंत जनावरांच्या छावण्या सुरू राहणार आहेत. येत्या काही दिवसांतच आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे आताच लक्ष देऊन टँकर व चारा छावण्यांबाबत ठोस निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा आचारसंहितेकडे बोट दाखवू नका, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने आदर्श ग्रामसेवक, सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य पुरस्कारांचे वितरण अजित पवार यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, सभापती प्रवीण माने, सुजाता पवार, राणी शेळके, सुरेखा चौरे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले की, ‘‘राज्यातील शिक्षक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका यांच्यासह शासनातील अनेक घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. आचारसंहितेपूर्वी शासनाने ग्रामसेवकांचे सर्व प्रश्न मार्गी लावावेत. ग्रामसेवकांच्या संपामुळे अनेक कामे खोळंबली आहेत. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी सरकार अपयशी ठरत असल्याची टीका पवार यांनी केली. सरपंच, उपसरपंच यांना मिळणारे मानधन त्यांना कमीपणा आणणारे आहे. लोकप्रतिनिधींना अधिक मानधन मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आमचे सरकार आल्यावर त्यामध्ये नक्कीच वाढ करू,’’ असे आश्वासनही पवार यांनी दिले. 

चांगले काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पुरस्कार देऊन गौरविले जाते हीच त्यांच्या कामाची पावती आहे. मात्र, त्यांनी यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. तीन वर्षांचे पुरस्कार एकदाच दिल्याने नाराजी व्यक्त करताना गुणवत्तेचा सत्कार वेळीच होणे गरजेचे आहे. तीन वर्षापूर्वी जे सरपंच होते, त्यांचे सरपंचपदही आता संपले असेल, त्यामुळे ज्या वर्षीचे पुरस्कार त्याच वर्षी द्यावेत, अशा सूचना पवार यांनी केल्या. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी केले. सूत्रसंचालन आशिष जराड यांनी केले, तर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी आभार मानले.

कमकुवत विरोधी  पक्ष धोक्याची घंटा काम चांगले असेल तर ते लाट थोपवू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवारसाहेब हेच आहेत. त्यांच्याविषयी लोकांमध्ये विश्वास होता म्हणूनच ते अनेक वर्षे राजकारण करत आहेत. मात्र, काही जण पक्षनिष्ठा बाजूला ठेवत आहेत. विरोधी पक्ष कमकुवत असणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असल्याचेही मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com