चारा छावणीच्या प्रलंबित प्रस्तावावर निर्णय घ्या : डॉ. दीपक म्हैसेकर

चारा छावणीच्या प्रलंबित प्रस्तावावर निर्णय घ्या : डॉ. दीपक म्हैसेकर
चारा छावणीच्या प्रलंबित प्रस्तावावर निर्णय घ्या : डॉ. दीपक म्हैसेकर

सातारा : चारा छावणीतील जनावरांना शासनाच्या निकषानुसार चारा, पेंड व पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे. चारा छावणीचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित असल्यास त्यावर तात्काळ निर्णय घ्या, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी (ता. ८) केल्या.

दहिवडी येथील तहसील कार्यालयात टंचाई आढावा बैठक डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपायुक्त प्रतापराव जाधव, उपायुक्त निलीमा धायगुडे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सूनिल थोरवे, माणचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले,‘‘रोहयोंतर्गत सार्वजनिक कामांचे प्रस्ताव आले, तर त्यास तात्काळ मंजूरी द्या. टँकरच्या खेपा शंभर टक्के होण्यावर भर द्या, टँकरचे मॉनिटरींग जीपीएसच्या माध्यमातून मोबाईलद्वारे करावे. हे काम संबंधित तालुक्याचे तहसीलदार, गट विकास अधिकाऱ्यांनी करावे. टँकरच्या खेपा लॉगबूकशीटशी पडताळून पहावे. धरणातील पाणीसाठा हा फक्त पिण्यासाठीच उपलब्ध कररावा, शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होणार नाही, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी.‘‘

सिंघल म्हणाल्या, ‘‘टंचाई भागातील पाणी उपसा शंभर टक्के बंद झाला पाहिजे. यासाठी महसूल, इरिगेशन विभागाने समन्वयाने काम करावे. ज्या ठिकाणी अवैध पाणी उपसा होत असेल, त्या ठिकाणची वीज जोडणी महावितरण कंपनीने तात्काळ काढून टाकावी. प्रलंबित चारा छावणीचे प्रस्ताव दोन दिवसांत पाठवा.‘‘ बैठकीनंतर विभागीय आयुक्तांनी माण तालुक्यातील ढाकणी तलावास, मोगराळे व वडगाव या चारा छावण्यांस भेट दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com