agriculture news in Marathi decision on cane chopping labor payment didnt came out in fourth meeting Maharashtra | Agrowon

चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा नाहीच 

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी यासह अन्य मागण्यांसाठी यंदा ऊसतोडणी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. 

नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी यासह अन्य मागण्यांसाठी यंदा ऊसतोडणी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. मजुरीच्या दरवाढीवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांपूर्वीही साखर संघाच्या कार्यालयात मजुर प्रतिनिधींसोबत बैठक झाली. मात्र त्यातही तोडगा निघाला नाही. यंदाच्या संपानंतर ही चौथी बैठक होती. सर्व संघटनांनी एकमत करुन दराबाबत बोलणी करावी, असे आवाहन साखर संघाने केले. मात्र दराबाबत संघटनांत एकमत नसल्याचेही यावेळी दिसून आले. तर, यंदा गाळपासाठी ऊस अधिक असल्याने हंगाम लांबण्याची शेतकऱ्यांना भीती आहे. 

दरम्यान, दसऱ्यानंतर दोन ते तीन दिवसात संपावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

ऊसतोड कामगारांच्या दराचा करार संपलेला असल्याने ऊसतोडणी दरात दुप्पट वाढ करावी, मुकादमाच्या कमिशनमध्येही वाढ करावी, लवादाचा करार पाच ऐवजी तीन वर्षाचा करावा यासह अन्य मागण्यासाठी यंदा ऊसतोडणी कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. संपावर तोडगा निघावा यासाठी नुकतीच साखर संघाच्या कार्यालयात साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. साखर संघाचे संचालक यांच्यासह ऊसतोडणी कामगार संघटनांचे नेते गहिनीनाथ थोरे पाटील, माजी आमदार केशवराव, प्रदीप भांगे, प्रा. सुशिला मोराऴे, मोहन जाधव, दत्तु भांगे, श्रीमंत जायभाये यांच्यासह संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

बैठकीत ऊसतोडणी मजुरांच्या दरवाढीसह इतर मागण्यांवर चर्चा झाली. दरवाढीबाबत प्रत्येक संघटनेच्या प्रतिनिधींनी वेगवेगळी मागणी केली. सर्व संघटनांनी दराबाबत एकमत करुन मागणी करावी, असे आवाहन यावेळी साखर संघाने केले. मात्र या बैठकीत दराबाबत एकमत झाले नाही. मात्र पुरेशी दरवाढ झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचे सर्व संघटनांनी यावेळी स्पष्ट केले. संपाबाबत चर्चा करुन तोडगा काढण्यासाठी ही चौथी बैठक होती. दसऱ्यानंतर दोन दिवसात तोडगा काढण्याचा प्रयत्न असेल, मात्र मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचे थोरे यांनी सांगितले. 

दरम्यान, शरद पवार यांनी संपावर तोडगा काढावा अशी मागणी असल्याने मजूर आणि कारखानदार दोघांचेही शरद पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. 

केवळ दहा टक्के मजुरांनी घर सोडले 
ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करण्यासाठी मजुरांच्या संघटनांनी संप पुकारला आहे. तरीही राज्यातील चाळीसगाव, जळगाव भागातील काही मजूर कारखान्यांकडे गेले आहेत. मात्र मराठवाडा, नगर, धुळे, वाशीम, पुसद भागातील मजुरांनी घर सोडलेले नाही. योग्य दरवाढ झाल्याशिवाय घरही सोडणार नाही, असे ऊसतोडणी मजूर संघटनांनी बैठकीत सांगितले. 
 


इतर अॅग्रो विशेष
संशोधनवृत्तीला सातत्याची जोड शेतीउपयोगी...प्रत्येक माणसात एक संशोधक दडलेला असतो. अगदी खेळणी...
वीज जोडणी न देताच कृषीपंपाची लाखोंची...नांदेड : कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील पाच...
कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरेल :...मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध हटवले...
‘स्वाभिमानी’चा मोर्चा स्थगितसातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कऱ्हाडला...
संत्रा पट्ट्यातून ‘किसान रेल’ सुसाटनागपूर : संत्रा वाहतुकीकरिता रेल्वेचा स्वस्त आणि...
संत्रा आंबिया बहाराला ४२ कोटींची भरपाईअमरावती : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या...
केळी उत्पादकांची लूट थांबवा, अन्यथा...गिरगाव, जि. हिंगोली : राज्यातील अन्य...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः बंगालच्या उपसागराच्या आग्नेय व नैऋत्य...
शेतकऱ्यांनी पकडले सोयाबीन चोरअमरावती : घराच्या अंगणात ठेवलेले ३१ पोते सोयाबीन...
शासकीय खरेदीला प्रारंभ; कापूस दरात...जळगाव ः खानदेशात शासकीय कापूस खरेदी सुरू होताच...
सहकारी संघाकडूनही गाईच्या दूधदरात कपात नगर ः लॉकडाउन झाल्यानंतर दुधाची मागणी कमी झाली...
पशुखाद्य दरात वाढसांगली ः अतिवृष्टीमुळे पशुखाद्य तयार होणाऱ्या...
दुग्ध व्यवसायातून अल्पभूधारक शेतकऱ्याची...वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये कुटुंबाचा...
पशुपालनाने दिली आर्थिक प्रगतीला साथकोळन्हावी (ता. यावल, जि. जळगाव) येथील देवानंद...
तोतया व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादकांची...नाशिक : सध्या मागणीच्या तुलनेत सध्या कांद्याची...
गांडूळ खताने घातले उत्पन्नवाढीस खतपाणीसासवड, जि. पुणे ः वीटभट्टीच्या धंद्यात उधारी...
नियमित कर्जफेड करणारे शेतकरी...कोल्हापूर ः जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार नियमित...
ग्रामीण भागात नऊ लाख घरे बांधणार ः हसन...मुंबई : राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच...
विदर्भाच्या काही भागांत थंडीपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे झाले...
कारखाने भाडेतत्त्वावर देणाऱ्या समितीत...पुणे : आजारी साखर कारखाने व त्यांच्या अब्जावधी...