कृषी निविष्ठा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेणार ः जयंत पाटील

कृषी निविष्ठांची दुकाने काही काळ उघडी ठेवण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
Decision to continue Krishi Nivistha Kendras: Jayant Patil
Decision to continue Krishi Nivistha Kendras: Jayant Patil

सांगली ः जिल्ह्यात १५ मे नंतर लॉकडाउन संपल्यानंतर खरीप हंगामासाठी खते, बी-बियाणे यांचा सुरळीत पुरवठा व्हावा, या दृष्टीने कृषी निविष्ठांची दुकाने काही काळ उघडी ठेवण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक सोमवारी (ता. १०) पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. बैठकीस सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार संजय पाटील, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी उपस्थित होते.

बैठकीत शेततळे ५ एकर जमीन अट शिथिलता, खताचे दर कमी कराची मागणी झाली. प्रलंबित वीज जोडण्या लवकर करण्यात याव्यात, असे आदेश देण्यात आले. पीक विम्याबाबत ११ मे रोजी कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासमवेत बैठक होणार असल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यात खरीप क्षेत्र ३ लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्र असून ३३ हजार ६०० क्विंटल बियाणे मागणी तर १ लाख ४२ हजार १६० टन खत मागणी आहे.  जिल्ह्यात खरीप हंगामात २५८ शेतीशाळा राबविण्यात येणार असून ५१ महिला शेतीशाळा राबविण्याचे नियोजन केले आहे. खरीप हंगामामध्ये ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत नावीन्यपूर्ण पिकांचे प्रकल्प जोंधळा भात, माडग्याळ मटकी, रोपाव्दारे तूर लागण, सोयाबीन ग्राम बीजोत्पादन, शेवगा लागवड व ड्रॅगन फ्रूट लागवडीचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. कर्ज पुरवठा खरीप हंगामात १ हजार ८९० कोटी व रब्बी हंगामामध्ये ८१० कोटी असा एकूण २ हजार ७०० कोटी कर्ज वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

पीकविमा योजना व हवामान आधारित पीकविमा योजनेचा लाभ ट्रीगरमुळे विमा कंपन्या शेतकऱ्यांना देत नाहीत. याबाबत लोकप्रतिनिधींनी विचारणा केल्यानुसार मंगळवारी (ता. ११) कृषिमंत्री भुसे यांच्यासमवेत बैठक घेऊन ट्रीगरमध्ये सुधारणा करण्यात येईल, असे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे अपघात विम्याचा लाभ मिळण्यासाठी विलंब होतो. याबाबत सुद्धा योग्य ती सुधारणा करण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com