agriculture news in Marathi decision for farmers help within three days Maharashtra | Agrowon

तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्री

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. संकट अजून टळलेले नाही. त्यामुळं घाई-गडबडीत काही निर्णय घेणं योग्य होणार नाही. 

सोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. संकट अजून टळलेले नाही. त्यामुळं घाई-गडबडीत काही निर्णय घेणं योग्य होणार नाही. सध्या पंचनामे सुरु आहेत. नुकसानीचा आढावाही घेतला जातो आहे. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत दोन-तीन दिवसांत निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता.१९) येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.  

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या अक्कलकोट तालुक्‍यातील परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर सोलापुरात त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. 
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रणिती शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.  

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की हा परतीचा पाऊस आहे. किती आणि कसा पडेल, हे कोणीच सांगू शकणार नाही. प्रशासनाकडून इथल्या परिस्थितीची माहिती मी घेतली. सातत्याने त्यांच्याशी माझा संपर्क होता. आज इथे आलो, उद्या आणखी फिरणार आहे. हे संकट डोंगराएवढे आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देणं, दिलासा देणं माझं काम आहे. 

‘‘यापुढेही संकट टळलेले नाही. हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. त्या परिस्थितीत काय उपाययोजना करायची, याच्या सूचना दिलेल्या आहेत.  प्राणहानी, जीवितहानी होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले आहे. सध्या सगळीकडे पंचनामे सुरु आहेत. माहिती घेतो आहोत. मध्यंतरी निसर्ग चक्रीवादळाने कोकणात अतिवृष्टी झाली, पूर्वविदर्भातही अशीच परिस्थिती ओढावली. आता सोलापूर आणि पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यावर हे संकट आलं आहे. पण घाईगडबडीने काही निर्णय घेऊन मदत देण्यापेक्षा शेतकऱ्यांचे दुःख जाणून, त्याला मदत करायची आहे,’’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

पंतप्रधानांनी मदतीचे आश्‍वासन दिलंय
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारीच मला स्वतःहून फोन करुन विचारणा केली आहे. चिंता करु नका, आपल्याला आवश्‍यक ती मदत देऊ, असे आश्‍वासनही त्यांनी दिलं असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

राजकारण करु नये
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची मदत कधी मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे, याकडे लक्ष वेधता कोणीही राजकारण करु नये, राज्याला मदतीची गरज असेल, तर सर्वांनी मिळून केंद्राला मदत मागितली पाहिजे. पण विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी आलेलो नाही. मला फक्त शेतकऱ्यांना धीर द्यायचा आहे, असे उत्तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.


इतर अॅग्रो विशेष
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...
दक्षिण भारतात मुसळधार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेले बुरेवी...
खत विक्रीत वाढपुणे : देशात कोविड १९ ची समस्या तसेच लॉकडाउन...
राज्यात सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग...मुंबई : राज्यात पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
उपक्रमशील शेतीतून प्रगतीकडे...औरंगाबाद जिल्ह्यातील मात्र जालना जिल्ह्याच्या...
फळपिकांची वाट बिकटच! वाढत्या नैसर्गिक आपत्तींमध्ये हंगामी पिकांच्या...
पालाशयुक्त खतांबाबत आत्मनिर्भरतेची संधी पिष्टमय पदार्थ आणि प्रथिनांच्या चयापचयात तसेच...
शेतीतील नवी ‘ऊर्जा’पेट्रोलियम मंत्रालयाने थेट देशातील साखर...
आता इंधनालाही बांबूचा आधारगेल्या काही दशकांत पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात...
कृषी प्रवेशासाठी सीईटीचा निकाल जाहीरपुणे : महाराष्ट्र शासनाच्या ‘स्टेट कॉमन...
‘बुरेवी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली;...पुणे : बंगालच्या उपसागरात काही दिवसांपासून...
शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होणारनवी दिल्ली : केंद्र सरकारचे तीन मंत्री आणि शेतकरी...
रस्त्यानेच रोखली संत्रा प्रक्रिया...अमरावती : अवघ्या एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याने...
सांगलीत द्राक्ष हंगाम रोगांच्या विळख्यातसांगली :  द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून...
राज्यात फळबाग लागवडीचा उच्चांकपुणे ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...