agriculture news in marathi, decision to increase the security of the market committee, nashik, maharashtra | Agrowon

नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा निर्धार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. अवैध धंद्यांना लगाम लागावा म्हणून समितीची सर्व प्रवेशद्वारे यापुढे रात्री बारा ते पहाटे तीनपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच, या वेळी संचालक मंडळाच्या वाढीव मानधनालाही मंजुरी देण्यात आली. 

नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या चोऱ्यांच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. अवैध धंद्यांना लगाम लागावा म्हणून समितीची सर्व प्रवेशद्वारे यापुढे रात्री बारा ते पहाटे तीनपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच, या वेळी संचालक मंडळाच्या वाढीव मानधनालाही मंजुरी देण्यात आली. 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक बैठक सोमवारी (ता. १५) समितीच्या कार्यालयात पार पडली. बैठकीला सभापती शिवाजी चुंभळे, उपसभापती युवराज कोठुळे, संचालक जगदीश अपसुंदे, संदीप पाटील, चंद्रकांत निकम, प्रवीण नागरे, तुकाराम पेखळे, विश्‍वास नागरे, भाऊसाहेब खांडबहाले, हेमंत खंदारे, विमल जुंद्रे, ताराबाई माळेकर, संपत सकाळे, संजय तुंगार, दिलीप थेटे, रवींद्र भोये, रुची कुंभारकर, सहकार खात्याचे अधिकारी एस. एस. गांगुर्डे, सचिव अरुण काळे आदी उपस्थित होते. 

गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या मालाची व पैशांची चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर समितीकडे येणारे चोरमार्ग बंद करण्याचे निश्‍चित करण्यात आले. तसेच, समितीचे प्रवेशद्वार यापुढे रात्री बारा ते पहाटे तीनपर्यंत बंद राहणार आहे. या वेळी समितीच्या आधिपत्याखालील उपसमित्यांच्या कामकाजाबाबतही चर्चा झाली. ई-टेंडरिंगचा आग्रह धरतानाच सभापती, उपसभापती व संचालक मंडळाच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. या वेळी एकूण पंधरा विषयांना मंजुरी देण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...