Agriculture news in Marathi Decision of one day strike of power workers against privatization | Page 2 ||| Agrowon

खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा एकदिवसीय संपाचा निर्णय

टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 जुलै 2021

वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध देशभरातील वीज कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांच्या सर्व संघटनांनी १० ऑगस्ट रोजी एक दिवसीय संपाचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात प्रशासनाला नोटीसही बजावण्यात आली आहे.

नागपूर ः वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध देशभरातील वीज कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांच्या सर्व संघटनांनी १० ऑगस्ट रोजी एक दिवसीय संपाचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात प्रशासनाला नोटीसही बजावण्यात आली आहे. सोबतच विद्युत (संशोधन) कायदा २०२१ संसदेत सादर होईल त्या दिवसापासून देशव्यापी बेमुदत ‘लाइटनिंग स्ट्राइक’चाही इशाराही संयुक्त संघर्ष समितीने दिला आहे. देशभरात एकत्र वीज कामगारांचा संप झाल्यास ब्लॅक आउट होण्याची शक्यता आहे. 

केंद्र सरकारकडून वीज उद्योगाच्या खासगीकरणाचा रेटा लावण्यात आला आहे. या विरोधात वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी यापूर्वीच आक्रमक भूमिका घेत आंदोलने सुरू केली आहेत. आता विद्युत (संशोधन) कायदा २०२१ संसदेत आणण्याची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील वीज कर्मचारी अभियंते व अधिकाऱ्यांच्या सर्व संघटनांनी अलीकडेच संयुक्त बैठक घेतली. यात संसदेसमोर समोर ३ ते ६ ऑगस्ट दरम्यान धरणे आंदोलन करण्याचा व १० ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्रीपासून २४ तासांचा राज्यव्यापी संप करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

१० ऑगस्टपूर्वी हे विधेयक संसदेत सादर झाल्यास त्याच दिवसांपासून सर्व कर्मचारी अभियंते व अधिकारी राज्यस्तरीय कृती समितीच्या नेतृत्वात ‘लाइटनिंग स्ट्राइक’ करतील असा निर्णयही समितीने घेतला आहे. वीज कामगार महासंघ वगळता अन्य सर्व संघटना आंदोलनात सहभागी होतील.

प्रशासनाला संपाची नोटीस 
१० ऑगस्टचा संप व राज्यव्यापी आंदोलनाची नोटीस नॅशनल को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉइज व इंजिनिअर्समार्फत स्थानिक प्रशासनासह पंतप्रधान व केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाला देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन व चारही शासकीय वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनाला शनिवारी देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे संयुक्त सचिव व्यंकटेश नायडू यांनी दिला.

अशा आहेत मागण्या 

  • प्रस्तावित विद्युत (संशोधन) कायदा २०२१ व स्टॅण्डर्ड बिडिंग डॉक्युमेंट रद्द करा. 
  • वीज उद्योगाच्या खासगीकरणाचे धोरण व अस्तित्वातील फ्रेन्चाईसी रद्द करा.  
  • सर्व कंत्राटी व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना कायम करा.

इतर ताज्या घडामोडी
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...