agriculture news in marathi Decision to Send Railways for migrants from Maharashtra | Agrowon

अडकलेल्या मजुरांना दिलासा; विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 मे 2020

नवी दिल्ली : विविध राज्यांत अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्यास केंद्र सरकारने शुक्रवारी (ता.२) परवानगी दिली.

नवी दिल्ली : विविध राज्यांत अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्यास केंद्र सरकारने शुक्रवारी (ता.२) परवानगी दिली. त्यानुसार रेल्वे गाड्या सोडण्याचे विशेष नियोजन करण्याचे रेल्वे मंत्रालयाला निर्देश दिले आहेत. या ‘श्रमिक स्पेशल’ रेल्वे गाड्या सोडण्यास शुक्रवारपासून सुरवातही झाली. लिंगमपल्ली ते हटिया आणि अलुवा ते भुवनेश्वर या गाड्या शुक्रवारी सोडल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख मंत्र्यांबरोबर शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत टप्प्याटप्प्याने लॉकडाउन उठविण्याच्या उपायांबाबत चर्चा झाली. कोरोनाशी लढण्यासाठी २४ मार्चपासून लागू केलेला लॉकडाउन देशभरात सर्वत्र कायमस्वरूपी जारी ठेवणे देशाच्या अर्थकारणाच्या आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पंतप्रधानांनी गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पियुष गोयल, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आदींची चर्चा केली. गोयल यांच्याकडे रेल्वे बरोबरच वाणिज्य विभागाचाही कार्यभार असल्याने कोरोनाचा प्रकोप नसणाऱ्या आणि गेल्या २१ दिवसांमध्ये एकही रुग्ण सापडलेल्या भागांमधून औद्योगिक पट्ट्यांमधून सोशल डिस्टन्ससिंग, मास्क वापरणे बंधनकारक यासारखे नियम पाळून लॉकडाउन मागे घेण्याबाबत हालचाली सुरू आहेत.

रेल्वेच्या हालचाली जोरात
देशभरात विविध राज्यांमध्ये लॉकडाउनमुळे अडकलेल्या हजारो नव्हे तर लाखो स्थलांतरित मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात रेल्वेने जाण्यासाठी आता केंद्राने परवानगी दिली आहे. तेलंगणातून विशेष रेल्वे गाडी सोडण्याचे गुरूवारी जाहीर झाल्यावर महाराष्ट्रासह विविध राज्यांकडून केंद्र सरकारवर याबाबत मोठा दबाव आला होता. मजुरांची प्रचंड संख्या असल्याने बसने त्यांची वाहतूक करणे अव्यवहार्य असल्याचे मत अनेक राज्यांनी मांडले होते . त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांबरोबरच्या बैठकीनंतर गोयल यांनी आज रेल्वे बोर्डाच्या आणि मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर दीर्घ चर्चा करून प्रवासी गाड्या सोडण्याच्या नियोजनाबाबतचा आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारांबरोबर तसेच रेल्वेच्या आठही प्रमुख विभागांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून याबाबतचे नियोजन सुरू केले आहे.

काय ठरले चर्चेत..?

  • स्थलांतरित मजुरांची, विद्यार्थ्यांची आणि पर्यटकांची प्रवास व्यवस्थादेखील रेल्वेद्वारे करण्यात यावी
  • तेलंगण आणि केरळमधून दोन गाड्या सोडण्यात आल्या आहेत. पुढील टप्प्यात दिल्लीसह मुंबई , नागपूर, चेन्नई , सुरत, अहमदाबादसह
  • विविध राज्यांमधून देखील स्थलांतरित मजुरांसाठी विशेष नाॅन- एसी प्रवासी गाड्या सोडण्याबाबत रेल्वेने नियोजन
  • या प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा नियम काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता
  • २४ डब्यांमध्ये जास्तीत जास्त १२०० ते १३०० प्रवासीच घेऊन जाण्यासाठी परवानगी मिळणार
  • प्रवास करणाऱ्या सर्व मजुरांच्या भोजनाची व्यवस्थाही रेल्वेलाच करावी लागणार
     

पहिल्या दोन गाड्या नाशिकमधून

लॉक डाउनमुळे अडकलेल्या महाराष्ट्रामधील स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या नाशिकमधून सुटणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नाशिकमधून भोपाळ आणि लखनौसाठी दोन गाड्या सोडण्यात येतील. त्यापाठोपाठ मुंबई, नागपूर आणि
इतर शहरातून जाणाऱ्या गाड्यांचे नियोजन जाहीर करण्यात येईल. देशाच्या विविध भागांमधून स्थलांतरित मजुरांसाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्याबाबत रेल्वेने पुढच्या एका आठवड्याचे म्हणजे ८ मे पर्यंतचे नियोजन केले आहे.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...