Agriculture news in marathi The decision of sorghum bread in school is pending | Agrowon

ज्वारीची भाकरी शाळेत थापण्याचा निर्णय हवेतच

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

वर्धा : राज्यातील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात प्रथिनयुक्त ज्वारीची भाकरी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले. मात्र, २०१९-२० हे शालेय सत्र सुरू होण्याच्या काळात झालेली ही घोषणा सत्र संपण्याचा काळ आला, तरी पूर्णत्वास जाण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अद्यापही तांदळाच्या खिचडीवरच भूक भागवावी लागत असल्याची स्थिती आहे.

वर्धा : राज्यातील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात प्रथिनयुक्त ज्वारीची भाकरी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले. मात्र, २०१९-२० हे शालेय सत्र सुरू होण्याच्या काळात झालेली ही घोषणा सत्र संपण्याचा काळ आला, तरी पूर्णत्वास जाण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अद्यापही तांदळाच्या खिचडीवरच भूक भागवावी लागत असल्याची स्थिती आहे.

 जिल्हा परिषदेच्या शाळांची रोडावत असलेली पटसंख्या टिकावी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, यासाठी शालेय शिक्षण विभागाने मध्यान्ह भोजनाची संकल्पना अस्तित्वात आणली. तेव्हापासून यात विविधता आणण्याच्या नावावर शासनाने अनेक प्रयोग केले. यातील बरेच प्रयोग अपयशी ठरल्याचा इतिहास आहे. या पार्श्‍वभूमीवर मध्यान्ह भोजनात ज्वारी, नाचणीची भाकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

जून महिन्यात पुण्याच्या अलिबाग येथे मुख्य शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शाळेतील तांदळाचा भार २५ टक्‍के कमी करण्यासाठी भाकरी देण्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. ऑक्‍टोबर महिन्यापासून विद्यार्थ्यांना भाकरी देण्याचे ठरले. आता हे शैक्षणिक सत्र संपण्याचा काळ एक महिन्यावर आहे. म्हणजेच मार्च महिन्यात ते संपेल. तरीही शाळांतील विद्यार्थ्यांना भाकरी मिळाल्या नाहीत. त्यामुळे इतर प्रयोगाप्रमाणे हा प्रयोगही कागदावरच राहिल्याने शालेय पोषण आहारातील बदलाचा मुद्दा पुन्हा नावालाच ठरला, अशी टीका शिक्षकांकडून होत आहे. 

शिक्षक संघटनांकडून विरोध 

भाकरीच्या प्रयोगाला राज्यातील अनेक शिक्षक संघटनांकडून विरोध झाला. ज्वारी ठेवायची कुठे, या भाकरी भाजणार कोण, असे अनेक प्रश्‍न, या संघटनांकडून विचारण्यात आले. त्यामुळे भाकरीचा निर्णय हवेतच विरल्याची चर्चा आहे. 

चिमुकल्यांच्या भावनांशी खेळ

शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनांतर्गत प्रोटीनयुक्‍त आहार देण्यासाठी मध्यंतरी दूध आणि अंडी देण्याचाही निर्णय झाला होता. त्यानुसार दूध पावडर पुरविण्यासाठी कंत्राटही देण्यात आले होते. पण, ती काही अद्याप विद्यार्थ्यांपर्यंत पोचली नाही. असाच प्रकार अंड्यांचाही झाला. त्यामुळे हा केवळ विद्यार्थ्यांना नादी लावायचा प्रकार आहे का?, चिमुकल्यांच्या भावनांशी खेळ आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...