agriculture news in Marathi declare drought in tribal talukas Maharashtra | Agrowon

आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच पावसाने पाठ फिरवल्याने दुहेरी भीषण संकट ओढवले आहे. 

नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच पावसाने पाठ फिरवल्याने दुहेरी भीषण संकट ओढवले आहे. या परिस्थितीत आदिवासी बहुल इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, कळवण, सुरगाणा या तालुक्यांमध्ये पाऊस नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे भागात कोरडा दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार व हिरामण खोसकर यांनी राज्यसरकारकडे केली आहे. 

खरीप हंगामात पावसाची गरज असताना पावसाळा संपत आला असून अपेक्षित पाऊस नाही. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. यासंदर्भात संबंधित तालुक्याच्या आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पावर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे परिस्थिती मांडली असून मागणीचे पत्र दिले आहे. 

जिल्ह्याचा पश्चिम-उत्तर भाग पावसावर अवलंबून आहे. मुख्यतः भात, नागली, वरई व भुईमूग ही पिके घेतली जातात. मात्र पावसाअभावी ही पिके संकटात सापडली असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. त्यामुळे कळवण, सुरगाणा, पेठ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांत पिण्यासाठी पाणी नाही, तर अनेकांनी उपलब्ध पाण्यावर लागवडी केल्या आहेत. त्यामुळे कोरडा दुष्काळ घोषित करावा व आदिवासी पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी व दुष्काळी कामे त्वरित सुरू करावीत, अशा मागण्या करण्यात आल्या. 

मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद 
विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ, 'कळवण-सुरगाणा'चे आमदार नितीन पवार, 'इगतपुरी-त्र्यंबकेश्वर'चे हिरामण खोसकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद देऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयावर चर्चा करून निर्णय घेण्याची आश्‍वासन दिली. सुरगाणा तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील प्राप्त परिस्थितीचा अहवाल सादर करण्याची सूचना संबंधितांना दिल्याचे आमदार नितीन पवार यांनी सांगितले. 
 


इतर अॅग्रो विशेष
पणन सुधारणांना महाराष्ट्राचा ‘ब्रेक’मुंबई  : केंद्र सरकारच्या कृषी (पणन)...
शेतीमाल खरेदीत फसवणुकीची पहिली तक्रार...नागपूर : केंद्र सरकारच्या नवीन शेतीमाल...
माॅन्सून पश्चिम राजस्थान, पंजाबच्या...पुणे ः नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने माघारी...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा...पुणे  ः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील...
शेतमाल खरेदीत सुधारणा कधी?कापूस आणि सोयाबीन ही महाराष्ट्रातील खरीप...
शेतकऱ्यांना हमीभावाचीच हमी मिळत नाहीनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहाव्या ...
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...