agriculture news in marathi Declare fertilizer prices : agriculture commissioner | Agrowon

खत कंपन्यांनी किमती जाहीर कराव्यात : कृषी आयुक्तालय

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 मे 2020

राज्यात खतांची खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सर्व खत कंपन्यांनी आपआपल्या उत्पादनांच्या किमती प्रसार माध्यमांमधून जाहीर कराव्यात, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.

पुणे: राज्यात खतांची खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सर्व खत कंपन्यांनी आपआपल्या उत्पादनांच्या किमती प्रसार माध्यमांमधून जाहीर कराव्यात, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत.

निविष्ठा व विस्तार संचालक विजयकुमार घावटे यांनी खत उत्पादक कंपन्यांना येत्या खरीप हंगामात किमतीविषयी दक्ष राहण्याबाबत सूचित केले आहे. गुणनियंत्रण निरीक्षकांनाही क्षेत्रीय पातळीवर तपासणी करताना भाव फलकावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

“शेतकऱ्यांनी खतांची खरेदी सुरू केली आहे. खतांची विक्री रास्त भावात होण्यासाठी तसेच फसवणूक टाळण्यासाठी खतांचे उत्पादन किंवा विक्री करणाऱ्या कंपनीने खतांच्या ग्रेडसहीत किमती जाहीर करायला हव्यात. वर्तमानपत्रांमधून या किमती जाहीर केल्यास शेतकरी वर्गात जागृती होईल. आम्ही तसे खत कंपन्यांना कळविले आहे, “अशी माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी देखील दर्शनी भागात खतांच्या किमतीचे फलक लावले पाहिजेत. त्यासाठी कंपन्यांनी किरकोळ व घाऊक खत विक्रेत्यांना सूचना द्याव्यात. विक्रेत्यांकडून कोणत्याही स्थितीत जादा दराने खतांची विक्री होणार नाही यासाठी कंपन्यांनी आपआपल्या यंत्रणांना काळजी घेण्याबाबत कळवावे, असेही आयुक्तालयाने या कंपन्यांना सांगितले आहे.

काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे 
दरम्यान, कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी राज्यात यंदा खत पुरवठा सुरळितपणे होत असल्याचे स्पष्ट केले होते. “कोरोना स्थितीमुळे खतांचा काळाबाजार किंवा जादा दराने विक्री झाल्याचे निदर्शनास आल्यास आम्ही विक्रेत्यांचे परवाने रद्द करू तसेच गुन्हे देखील दाखल करू,” असाही इशारा आयुक्तांनी यापूर्वीच दिला आहे.


इतर अॅग्रो विशेष
देशात यंदा सर्वसाधारण मॉन्सून; १०२...नवी दिल्ली : देशात यंदा सर्वसामान्य मॉन्सून आणि...
Breaking : मॉन्सून एक्सप्रेस केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
मॉन्सून आज केरळात येण्याचे संकेतपुणे  : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांलगत...
कोकणात मुसळधार पावसाचा इशारापुणे  : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे...
आठवडाभरापासून टोळधाड विदर्भातचनागपूर   ः गेल्या आठवडाभरापासून...
परभणीतील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीत...परभणी  ः राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
चाकणच्या जनावरे बाजारात एक कोटींची...पुणे  ः गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून ‘...
भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्गसोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त...
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका...नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या...
विदर्भात टोळधाडीची अस्तित्व कायमनागपूर : कृषी विभागाकडून टोळधाड नियंत्रणासाठी...
राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे...
राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत...
शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू...बुलडाणा ः या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त...
राज्यात बेदाण्याचे सव्वा दोन लाख टन...सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना...