Agriculture News in Marathi Declare a wet drought | Agrowon

ओल्या दुष्काळाची घोषणा करा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

विदर्भ, मराठवाड्यात मागील दोन दिवसांत संततधार पाऊस, अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांची काढणीला आलेली सोयाबीन, ज्वारी, कपाशीची पिके हातातून गेली आहेत. याआधीही हंगामात नुकसान झालेले आहे.

अकोला : विदर्भ, मराठवाड्यात मागील दोन दिवसांत संततधार पाऊस, अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांची काढणीला आलेली सोयाबीन, ज्वारी, कपाशीची पिके हातातून गेली आहेत. याआधीही हंगामात नुकसान झालेले आहे. त्यामुळे कुठलेही कारण न शोधता शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेत रविकांत तुपकर यांनी शासनाकडे केली आहे. दुष्काळ जाहीर न केल्यास संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी या निमित्ताने दिला आहे.

 या बाबत तुपकर यांनी म्हटले आहे, १६ आणि १७ ऑक्टोबरला अतिवृष्टी झाली. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात शिल्लक असलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतांमध्ये नद्या तयार झाल्या. शेतकरी ढसाढसा रडतो आहे. तरीही राज्यकर्ते त्याच्याकडे बघायला तयार नाहीत. या पूर्वीच्या नुकसानासाठी जी मदत राज्य सरकारने घोषित केली होती, ती तोकडी आहे. ती अजूनसुद्धा मिळालेली नाही. पहिलेही नुकसान झालेले आहे. आताही अतिवृष्टी झाली. राज्य असो की केंद्र, या दोन्ही सरकारांना पळ काढता येणार नाही. केंद्राने मोठे मन करावे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत करावी.

राज्यातील मंत्र्यांना या जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कुठल्याही अटी, निकष न लावता भरीव मदत करा. तिजोरीत पैसा नाही या सबबीखाली तुम्हाला दूर जाता येणार नाही. ही सर्व जबाबदारी तुमची आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर मदत करणार आहात काय, असा प्रश्‍नही तुपकर यांनी विचारला आहे. केंद्र व राज्य सरकारने ओल्या दुष्काळाची घोषणा केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीने रस्त्यावर उतरेल. याचे जे काही परिणाम होतील त्यास सरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला.


इतर बातम्या
सोयापेंड आयातीचा प्रस्ताव नाहीपुणे ः पोल्ट्री उद्योगाने सोयापेंड आयातीसाठी...
सरसेनाध्यक्ष हेलिकॉप्टर अपघातामध्ये...नवी दिल्ली ः तमिळनाडूमध्ये लष्करी हेलिकाॅप्टरला...
सोयाबीन हेक्टरी पिकले बारा क्विंटल ३५...लातूर : पीक कापणी प्रयोगाअंती लातूर जिल्ह्यात...
‘पशुसंवर्धन’च्या लाभासाठी मराठवाड्यातून...औरंगाबाद : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध लाभाच्या...
मंजूर रस्त्यांच्या कामांना ...अकोला ः जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २५...
बंधारे ढीगभर, तरीही पाणीटंचाई शिगेला नागपूर : नरखेड तालुक्यात अनेक ठिकाणी छोटी-मोठी...
पीकविमा जाहीर झाला, पैसै कधी मिळणार? नगर ः नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भरलेला गत वर्षीचा...
‘नाफेड’साठी खरेदी केलेला कांदा चाळीतच...नाशिक : केंद्राच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत ‘...
सातारा जिल्ह्यात पावसाचा १५ हजार...सातारा : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या...
शेतकरी संघटनेचा ठिय्या;  ३५...अकोला ः पातूर तालुक्यातील सस्ती परिसरातील...
पीक आमचं, भावही आम्हीच निश्‍चित करू : ...कोंढाळी, जि. नागपूर : आता पीक आमचे आणि त्याचा...
पुणे जिल्हा बँकेसाठी १५९ अर्ज पात्रपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होत असतानाच,...
देशात नवा खत कायदा आणण्याच्या हालचालीपुणे ः देशासाठी स्वतंत्र खत कायदा तयार करण्याच्या...
शेवग्याला दराची झळाळीकोल्हापूर : राज्यात नुकत्याच झालेल्या...
पीक कापणी प्रयोग  ‘महाडीबीटी’वर कृषी...नागपूर : पीक कापणी प्रयोगाच्या तक्त्यांची संख्या...
बायो-सीएनजी गॅसवर ट्रॅक्टर चालविण्याचा...माळेगाव, जि. पुणे ः शेती आणि शेतीपूरक व्यवसाय...
बायोसिरप तंत्रामुळे इथेनॉल उद्योगाचे...पुणे ः उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करता येते;...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या...
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...नांदेड : जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना...