Agriculture News in Marathi Declare a wet drought | Agrowon

ओल्या दुष्काळाची घोषणा करा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

विदर्भ, मराठवाड्यात मागील दोन दिवसांत संततधार पाऊस, अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांची काढणीला आलेली सोयाबीन, ज्वारी, कपाशीची पिके हातातून गेली आहेत. याआधीही हंगामात नुकसान झालेले आहे.

अकोला : विदर्भ, मराठवाड्यात मागील दोन दिवसांत संततधार पाऊस, अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांची काढणीला आलेली सोयाबीन, ज्वारी, कपाशीची पिके हातातून गेली आहेत. याआधीही हंगामात नुकसान झालेले आहे. त्यामुळे कुठलेही कारण न शोधता शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेत रविकांत तुपकर यांनी शासनाकडे केली आहे. दुष्काळ जाहीर न केल्यास संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी या निमित्ताने दिला आहे.

 या बाबत तुपकर यांनी म्हटले आहे, १६ आणि १७ ऑक्टोबरला अतिवृष्टी झाली. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात शिल्लक असलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतांमध्ये नद्या तयार झाल्या. शेतकरी ढसाढसा रडतो आहे. तरीही राज्यकर्ते त्याच्याकडे बघायला तयार नाहीत. या पूर्वीच्या नुकसानासाठी जी मदत राज्य सरकारने घोषित केली होती, ती तोकडी आहे. ती अजूनसुद्धा मिळालेली नाही. पहिलेही नुकसान झालेले आहे. आताही अतिवृष्टी झाली. राज्य असो की केंद्र, या दोन्ही सरकारांना पळ काढता येणार नाही. केंद्राने मोठे मन करावे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत करावी.

राज्यातील मंत्र्यांना या जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. ताबडतोब ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कुठल्याही अटी, निकष न लावता भरीव मदत करा. तिजोरीत पैसा नाही या सबबीखाली तुम्हाला दूर जाता येणार नाही. ही सर्व जबाबदारी तुमची आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर मदत करणार आहात काय, असा प्रश्‍नही तुपकर यांनी विचारला आहे. केंद्र व राज्य सरकारने ओल्या दुष्काळाची घोषणा केली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीने रस्त्यावर उतरेल. याचे जे काही परिणाम होतील त्यास सरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी दिला.


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...