agriculture news in marathi Declare wet drought in Akola district demads BJP | Page 2 ||| Agrowon

अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा : भाजपची मागणी

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 सप्टेंबर 2021

अकोला ः जिल्ह्यात सरकारने तातडीने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. 

अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून चार जणांचा मृत्यू झाला. खरिपाची पिके १०० टक्के वाया गेली. कापूस, सोयाबीनचे पीक कमरेइतक्या पाण्यात होते. या संकटामुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झालेला आहे. सरकारने तातडीने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. 

याबाबत जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर व पक्षाच्या नेत्यांनी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे निवेदनही पाठवले. याबाबत म्हटले, की शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असताना सरकार मदत करेल की नाही यावर प्रश्‍नचिन्ह आहे. एकही मंत्री अद्याप शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला गेलेले नाहीत. पिके पाण्याखाली गेली. महापुराने जमिनी खरडून गेल्या. अशी परिस्थिती कधीच झालेली नव्हती. पंचनामे, पाहणीचे कागदोपत्री घोडे नाचविण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना सात-बारा बघून मदत करण्याची गरज आहे. 

जिल्ह्यात सरासरी टक्केवारीच्या तुलनेत १०९ टक्के जास्त पाऊस झाला आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत द्यायला हवी. अगोदरच विमा मिळाला नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात संताप आहे. याची दखल घेत तातडीने संकटात मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यास सरकारला महागात पडेल, असा इशारा आमदार सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात रवी गावंडे, श्रीकृष्ण मोरखडे, महापौर अर्चना मसने यांच्यासह इतरांनी दिला.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...