Declare a wet drought: Darekar
Declare a wet drought: Darekar

ओला दुष्काळ जाहीर करा : दरेकर

परभणी : राज्य सरकारने अतिवृष्टी मुळे हतबल शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पहाता तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.

परभणी  : राज्य सरकारने अतिवृष्टी मुळे हतबल शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पहाता तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. बागायती पिकांसाठी हेक्टरी ५० हजार, तर कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली.

दरेकर यांनी रविवारी (ता.४) जिल्ह्यातील नावकी (ता. पूर्णा), देवलगाव आवचार (ता.मानवत), भोगाव साबळे (ता.परभणी) शिवारात अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची पहाणी केली.  

शेतकऱ्यांच्या सभस्या ऐकूण घेतल्या. जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस,भाजीपाला, फळबागा, भाजीपाला आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाच्या मदतीअभावी शेतकरी हतबल झाले आहेत. या परिस्थितीत राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीकविमा नुकसान भरपाई द्यावी. नुकसानीची व्याप्ती अधिक आहे. सरसकट पंचनामे करण्याचा  निर्णय घ्यायला हवा, अशी मागणी दरेकर यांनी केली. 

शेतकऱ्यांच्या पाठिशी भाजप खंबीरपणे उभा आहे. आठवडाभरात  सरकारने निर्णय घेतले नाहीत, तर  भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, भाऊसाहेब देशमुख, ‘भाजप’चे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, आनंद भरोसा, विठ्ठल रबदडे, सुरेश भुमरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे आदीसह शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com