मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्या 

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभागीय आयुक्तालयासमोर मंगळवारी (ता. १२) धरणे दिले. या वेळी मनसेच्या वतीने विभागीय आयुक्तांना मागण्यांबाबत निवेदनही देण्यात आले.
ओला दुष्काळ जाहीर करून  तातडीने आर्थिक मदत द्या  By declaring a wet drought Provide immediate financial assistance
ओला दुष्काळ जाहीर करून  तातडीने आर्थिक मदत द्या  By declaring a wet drought Provide immediate financial assistance

औरंगाबाद : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभागीय आयुक्तालयासमोर मंगळवारी (ता. १२) धरणे दिले. या वेळी मनसेच्या वतीने विभागीय आयुक्तांना मागण्यांबाबत निवेदनही देण्यात आले.  मराठवाड्यात अतिरिक्त पावसाने शेतकऱ्यांचे खरीप पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. सोयाबीन, उडीद, मूग ही पिके आजही पाण्यात आहेत. त्यामुळे ती पिके पूर्णपणे हातची गेलेलीच आहेत. शेतकऱ्यांच्या फळबागा वाहून गेल्या आहेत. अतिरिक्त झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांसह शेत मजुरांचीही अनेक ठिकाणी जिवितहानी झाली आहे. नुकसान व जीवित हानी दिसत असून देखील सरकार मदत करत नाही. त्यामुळे लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन केल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे. मागण्या शासन दरबारी पोहचवून त्या तत्काळ मान्य होतील, अशी कार्यवाही करावी, अशी विनंतीही मनसे नेते दिलीप धोत्रे, अशोक तावरे, संतोष नागरगोजे, प्रकाश महाजन, सुमीत खांबेकर, सुहास दाशरथे, श्रीराम बादाडे, रुपेश सोनटक्के आदींनी केली आहे. 

...अशा आहेत मागण्या 

  • मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विना पंचनामा सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्या 
  • पशुधन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना गव्हाण पंचनामा करून प्रति जनावर ५० हजार रुपयेप्रमाणे मदत करावी   
  • ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीचे तीन भाग न करता एकरकमी पैसे द्या 
  • महावितरणाने विद्युत रोहित्र दुरुस्तीसाठी ८० टक्के वीजबिल भरणा असेल, तरच रोहित्र दुरुस्त केले जाणार असा, जो नवीन आदेश काढला आहे, तो रद करा 
  • एसडीआरएफ साह्यता निधी योजनेत बीड जिल्ह्याचा समावेश करा 
  • ग्रामीण भागातील रस्ते आणि पूल तत्काळ दुरुस्त करा 
  • घरे वाहून गेलेल्या तसेच घराची पडझड झालेल्या कुटुंबांना घर बांधणी व दुरुस्तीसाठी तत्काळ शासकीय मदत करा. 
  • ई-पीक पहाणी रद्द करा 
  • अटी-शर्ती न घालता नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात यावा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com