Agriculture News in Marathi By declaring a wet drought Provide immediate financial assistance | Agrowon

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्या 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभागीय आयुक्तालयासमोर मंगळवारी (ता. १२) धरणे दिले. या वेळी मनसेच्या वतीने विभागीय आयुक्तांना मागण्यांबाबत निवेदनही देण्यात आले. 

औरंगाबाद : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विभागीय आयुक्तालयासमोर मंगळवारी (ता. १२) धरणे दिले. या वेळी मनसेच्या वतीने विभागीय आयुक्तांना मागण्यांबाबत निवेदनही देण्यात आले. 

मराठवाड्यात अतिरिक्त पावसाने शेतकऱ्यांचे खरीप पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. सोयाबीन, उडीद, मूग ही पिके आजही पाण्यात आहेत. त्यामुळे ती पिके पूर्णपणे हातची गेलेलीच आहेत. शेतकऱ्यांच्या फळबागा वाहून गेल्या आहेत. अतिरिक्त झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांसह शेत मजुरांचीही अनेक ठिकाणी जिवितहानी झाली आहे.

नुकसान व जीवित हानी दिसत असून देखील सरकार मदत करत नाही. त्यामुळे लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन केल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे. मागण्या शासन दरबारी पोहचवून त्या तत्काळ मान्य होतील, अशी कार्यवाही करावी, अशी विनंतीही मनसे नेते दिलीप धोत्रे, अशोक तावरे, संतोष नागरगोजे, प्रकाश महाजन, सुमीत खांबेकर, सुहास दाशरथे, श्रीराम बादाडे, रुपेश सोनटक्के आदींनी केली आहे. 

...अशा आहेत मागण्या 

  • मराठवाड्यातील शेतकऱ्यांना विना पंचनामा सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्या 
  • पशुधन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना गव्हाण पंचनामा करून प्रति जनावर ५० हजार रुपयेप्रमाणे मदत करावी  
  • ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीचे तीन भाग न करता एकरकमी पैसे द्या 
  • महावितरणाने विद्युत रोहित्र दुरुस्तीसाठी ८० टक्के वीजबिल भरणा असेल, तरच रोहित्र दुरुस्त केले जाणार असा, जो नवीन आदेश काढला आहे, तो रद करा 
  • एसडीआरएफ साह्यता निधी योजनेत बीड जिल्ह्याचा समावेश करा 
  • ग्रामीण भागातील रस्ते आणि पूल तत्काळ दुरुस्त करा 
  • घरे वाहून गेलेल्या तसेच घराची पडझड झालेल्या कुटुंबांना घर बांधणी व दुरुस्तीसाठी तत्काळ शासकीय मदत करा. 
  • ई-पीक पहाणी रद्द करा 
  • अटी-शर्ती न घालता नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात यावा.

इतर ताज्या घडामोडी
शेततळ्याच्या अनुदानासाठी नगरला सर्वाधिक...नगर ः नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या...
कृषिपंपांची वीजतोडणी मोहीम तत्काळ...हिंगणा, जि. नागपूर : महावितरण कंपनीने कृषिपंपाचे...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत...जलालखेडा, जि. नागपूर : खरीप हंगाम सन २०२१-२२ ला...
अर्धापूर भागात केळीवर रोटावेटर; रोग,...नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
लाच घेताना पेठ तालुका कृषी अधिकाऱ्यास...नाशिक : कृषी सेवा केंद्राच्या परवान्याचे नूतनीकरण...
कृषिमंत्र्यांच्या तालुक्याची अतिवृष्टी...नाशिक: जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान...
यवतमाळ : पाणंद रस्त्यांची मोहीम अर्धवटयवतमाळ : शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाणंद रस्ते अतिशय...
सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या...सोलापूर ः जिल्ह्याच्या विविध भागांतील...
सोलापूर जिल्ह्यात फळपीक विम्याचा लाभ...सोलापूर : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी २०...जळगाव  ः खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची...
सोंडलेचा १७० कोटींचा निवाडा मंजूरचिमठाणे, जि. धुळे : शिंदखेडा व धुळे तालुक्यांना...
जळगाव जिल्ह्यात भरडधान्य खरेदी योजनेचा...जळगाव ः जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांना...
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज...नाशिक : निफाड तालुक्यात मका व सोयाबीन काढणीचे काम...
मेशी येथे आधारभूत खरेदी किंमतकडे...मेशी, ता. देवळा : आधारभूत किंमत खरेदी योजनेतर्गत...
गावकऱ्यांच्या श्रमामुळे ‘पद्मश्री’ :...नगर : ‘‘राजकारणापासून दूर राहून गावाच्या विकासावर...
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला...बुलडाणा : कापूस-सोयाबीन उत्पादकांचे प्रश्‍न,...
बारावीच्या परीक्षेसाठी आजपासून अर्ज...मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च...
जर्मनीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले बर्लिन: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत...
मुंबईत गुरुवारी २८३ नवे कोरोना रुग्ण; २...मुंबई : बुधवारच्या तुलनेत मुंबईत कोविड बाधित...
चेन्नई पुन्हा जलमय; अतिवृष्टीचा जबर...चेन्नई ः तमिळनाडूवर अतिवृष्टीचे संकट घोंघावू...