Agriculture news in marathi Decline in the market in Khandesh | Agrowon

खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घट

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उडदाची आवक नगण्यच आहे. दरही दबावात आहेत. अशा स्थितीत अनेक शेतकरी शासकीय  खरेदी योजनेत उडीद विक्रीसाठी नोंदणी करून घेत आहेत. 

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उडदाची आवक नगण्यच आहे. दरही दबावात आहेत. अशा स्थितीत अनेक शेतकरी शासकीय  खरेदी योजनेत उडीद विक्रीसाठी नोंदणी करून घेत आहेत. 

अतिपावसाने खानदेशात उडदाची मोठी हानी झाली आहे. पिके हातची गेली आहेत. अतिपावसाने मळणीवर आलेल्या उडदाचे अनेक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या महिन्याच्या सुरवातीला ज्या शेतकऱ्यांचा उडीद मळणीवर आला. त्यातील काही शेतकऱ्यांनी मजूर, मळणीची यंत्रणा तातडीने राबवून जांगडा मळणी यंत्राद्वारे उडदाची मळणी करून घेतली. यात ओलावा असलेल्या उडदाची मळणीदेखील झाली. यामुळे काही शेतकऱ्यांचा उडीद बऱ्यापैकी दर्जेदार आहे. 

अनेक शेतकऱ्यांचा किंवा अधिक पेरणी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या उडदाचे मोठे नुकसान अतिपावसात झाले. कारण, मजूर, यंत्रणेच्या अभावात वेळेत मळणी, कापणी होऊ शकली नाही. जळगाव जिल्ह्यात सुमारे १२ हजार हेक्टरवरील उडदाचे ७५ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. पेरणी सुमारे २१ हजार हेक्टर एवढी झाली होती.

धुळ्यातही सुमारे पाच हजार हेक्टर आणि नंदुरबारातही सुमारे सहा हजार हेक्टरवरील उडदाला अतिपावसाचा फटका बसला. बहुसंख्य शेतकऱ्यांच्या हाती उडदाचे पीक आलेले नाही. अशात ज्यांच्या घरात पीक आले आहे, त्यांनाही हवा तसा दर सध्या मिळत नसल्याचे चित्र आहे. 

शेतकऱ्यांकडून येणाऱ्या उडदासंबंधीचे व्यवहार जळगाव बाजार समितीत बंदावस्थेत आहेत. यातच शेतकऱ्यांच्या उडदाला १५०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर अमळनेर, चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा या प्रमुख बाजार समित्यांमध्ये आहे. हमीभाव मिळत नाही. त्यातच खरेदीदारांनी मंदी, कोरोनाचे कारण सांगून दर पाडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. 

जळगाव, धुळ्यात नोंदणी

बाजारात हमीभाव मिळत नसल्याने जळगाव, धुळे जिल्ह्यातील शेतकरी शासकीय खरेदी योजनेत निश्‍चित केंद्रात उडीद विक्रीसाठी नोंदणी करून घेत आहेत. या नोंदणीला गेल्या दोन दिवसांत प्रतिसाद मिळाला आहे.

जळगाव जिल्ह्यात सुमारे १५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर, धुळ्यातही सुमारे १२५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती मिळाली. जळगाव जिल्ह्यात पाचोरा, अमळनेर व जळगाव येथे उडीद खरेदी होईल. तर धुळ्यात धुळे, शिंदखेडा व शिरपूर येथे खरेदी केंद्र सुरू होईल.


इतर ताज्या घडामोडी
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...
गुलटेकडी येथे ‘तोलणारां’चे धरणे आंदोलनपुणे ः गुलटेकडी येथील बाजार समितीमधील भुसार...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ९३...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ लघू-मध्यम, मोठ्या...
पंतप्रधानांनी घेतली ‘जय सरदार’ची दखल बुलडाणा ः शेतकऱ्यांकडून मका खरेदी केल्यानंतर...
कोल्हापुरात दसरा सोहळा साध्या पध्दतीने...कोल्हापूर ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाचा दसरा...
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाः उद्धव...मुंबई: राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी नेहमी...
डाळिंब फळबागेचे हंगामनिहाय नियोजनतेलकट डागासाठी, पिठ्या ढेकूण किंवा बागेतील...
सूक्ष्म सिंचन पद्धतीवर कांदा लागवडकांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...