परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायम

दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायम
दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायम

परभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध शाळेतील दूध संकलनात दर महिन्याला होत असलेली घट ऑक्टोबर महिन्यातही कायम आहे. सप्टेबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये १ लाख ८० हजार १११ लिटरने घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या (२०१९) च्या ऑक्टोबरमधील दूध संकलनात ७ लाख ६२ हजार ६४७ लिटरने घट झाली. यंदा ५ लाख ९९ हजार ५१९ लिटर एवढे दुध संकलन झाले. 

यंदा ऑगस्टमध्ये एकूण ९ लाख ७३ हजार ७१९ लिटर, सप्टेबरमध्ये ७ लाख ७९ हजार ६३० लिटर, ऑक्टोबरमध्ये ५ लाख ९९ हजार ५१९ लिटर दूध संकलन झाले. यामध्ये परभणी येथील शितकरण केंद्रांतील २ लाख ५० हजार ३६६ लिटर, पाथरी येथील १ लाख ५३ हजार ९५६ लिटर, गंगाखेड येथील १ लाख २२ हजार ४६३ लिटर, हिंगोली येथील ४५ हजार २७ लिटर, नांदेड येथील २७ हजार ७०७ लिटर दुधाचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्याप्रमाणेच नांदेड वगळता अन्य ठिकाणच्या दूध संकलनात घट झाली आहे. 

शासकीय दुग्ध शाळेत गतवर्षीच्या (२०१८) ऑगस्टमध्ये १० लाख १९ हजार ७८८ लिटर, सप्टेंबरमध्ये ११ लाख ७९ हजार १२४ लिटर, तर ऑक्टोबरमध्ये १ लाख ८३ हजार ४२ लिटरने वाढ होऊन एकूण १३ लाख ६२ हजार १६६ दुध संकलन झाले होते. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये दूध संकलन वाढले होते. परंतु यंदा  मात्र सप्टेंबरच्या तुलनेत १ लाख ८० हजार १११ लिटरने घट झाली आहे. 

दुग्ध शाळेला घातलेल्या दूधाची देयके दर दहा दिवसांनी अदा केली जाणे अपेक्षित आहे. परंतु चालू आर्थिक वर्षामध्ये ही देयके मिळण्यासाठी ६० ते ९० दिवसांचा विलंब लागत आहे. गाव पातळीवरील सहकारी दूध उत्पादक व पुरवठा संस्थाचे कमिशन आणि दूध वाहतुक खर्चाची देयके थकित आहेत. या शिवाय सप्टेंबर पूर्वी असलेल्या चारा टंचाईमुळे, कडबा तसेच हिरवा चारा, सरकी पेंडीच्या दरात वाढ झाल्यामुळे अनेक शेतकरी दुध उत्पादकांनी दुधाळ जनावरांची विक्री करुन दूधाचे व्यवसाय बंद केले आहेत. त्यामुळे शासकीय दुग्ध शाळेतील दूध संकलनात दर महिन्याला घट होत असलेली घट ऑक्टोबरमध्ये कायम आहे.

ऑक्टोबरमधील दूध संकलन (लिटरमध्ये) 

शितकरण केंद्र दूध संकलन
परभणी २५०३६६ 
पाथरी १५३९५६ 
गंगाखेड १२२४६३ 
हिंगोली  ४५०२७ 
नांदेड २७७०७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com