Agriculture news in marathi, The decline in milk continued in October | Agrowon

परभणी : दूधातील घट ऑक्टोबरमध्येही कायम

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

परभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध शाळेतील दूध संकलनात दर महिन्याला होत असलेली घट ऑक्टोबर महिन्यातही कायम आहे. सप्टेबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये १ लाख ८० हजार १११ लिटरने घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या (२०१९) च्या ऑक्टोबरमधील दूध संकलनात ७ लाख ६२ हजार ६४७ लिटरने घट झाली. यंदा ५ लाख ९९ हजार ५१९ लिटर एवढे दुध संकलन झाले. 

परभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध शाळेतील दूध संकलनात दर महिन्याला होत असलेली घट ऑक्टोबर महिन्यातही कायम आहे. सप्टेबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये १ लाख ८० हजार १११ लिटरने घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या (२०१९) च्या ऑक्टोबरमधील दूध संकलनात ७ लाख ६२ हजार ६४७ लिटरने घट झाली. यंदा ५ लाख ९९ हजार ५१९ लिटर एवढे दुध संकलन झाले. 

यंदा ऑगस्टमध्ये एकूण ९ लाख ७३ हजार ७१९ लिटर, सप्टेबरमध्ये ७ लाख ७९ हजार ६३० लिटर, ऑक्टोबरमध्ये ५ लाख ९९ हजार ५१९ लिटर दूध संकलन झाले. यामध्ये परभणी येथील शितकरण केंद्रांतील २ लाख ५० हजार ३६६ लिटर, पाथरी येथील १ लाख ५३ हजार ९५६ लिटर, गंगाखेड येथील १ लाख २२ हजार ४६३ लिटर, हिंगोली येथील ४५ हजार २७ लिटर, नांदेड येथील २७ हजार ७०७ लिटर दुधाचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्याप्रमाणेच नांदेड वगळता अन्य ठिकाणच्या दूध संकलनात घट झाली आहे. 

शासकीय दुग्ध शाळेत गतवर्षीच्या (२०१८) ऑगस्टमध्ये १० लाख १९ हजार ७८८ लिटर, सप्टेंबरमध्ये ११ लाख ७९ हजार १२४ लिटर, तर ऑक्टोबरमध्ये १ लाख ८३ हजार ४२ लिटरने वाढ होऊन एकूण १३ लाख ६२ हजार १६६ दुध संकलन झाले होते. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये दूध संकलन वाढले होते. परंतु यंदा  मात्र सप्टेंबरच्या तुलनेत १ लाख ८० हजार १११ लिटरने घट झाली आहे. 

दुग्ध शाळेला घातलेल्या दूधाची देयके दर दहा दिवसांनी अदा केली जाणे अपेक्षित आहे. परंतु चालू आर्थिक वर्षामध्ये ही देयके मिळण्यासाठी ६० ते ९० दिवसांचा विलंब लागत आहे. गाव पातळीवरील सहकारी दूध उत्पादक व पुरवठा संस्थाचे कमिशन आणि दूध वाहतुक खर्चाची देयके थकित आहेत. या शिवाय सप्टेंबर पूर्वी असलेल्या चारा टंचाईमुळे, कडबा तसेच हिरवा चारा, सरकी पेंडीच्या दरात वाढ झाल्यामुळे अनेक शेतकरी दुध उत्पादकांनी दुधाळ जनावरांची विक्री करुन दूधाचे व्यवसाय बंद केले आहेत. त्यामुळे शासकीय दुग्ध शाळेतील दूध संकलनात दर महिन्याला घट होत असलेली घट ऑक्टोबरमध्ये कायम आहे.

ऑक्टोबरमधील दूध संकलन (लिटरमध्ये) 

शितकरण केंद्र दूध संकलन
परभणी २५०३६६ 
पाथरी १५३९५६ 
गंगाखेड १२२४६३ 
हिंगोली  ४५०२७ 
नांदेड २७७०७

 


इतर बातम्या
मॉन्सून यंदा वेळेवर पुणे : सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक...
शेतकऱ्यांकडे २९ लाख क्विंटल घरचे बियाणे पुणे ः कृषी विभागाने ग्रामबिजोत्पादन मोहिमेतून...
मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत...
पावसाचा प्रभाव वाढणार पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची...
पुणे बाजार समितीची अतिक्रमणविरोधी कारवाईपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे...
राज्यातील पाणीसाठा ४४ टक्क्यांवर पुणे ः राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला...
हरभरा दर पाच हजारांवर अकोला ः यंदा हरभऱ्याचा दर शासनाने जाहीर केलेल्या...
साठ कृषी कर्मचाऱ्यांचा कोरोनाने घेतला...पुणे ः कोविड १९ साथीच्या तडाख्यात सापडल्याने कृषी...
उत्कृष्ट दर्जाचे बियाणे उपलब्ध करून...यवतमाळ : चांगली उगवणक्षमता असलेले बियाणे तसेच...
बियाणे, खते बांधावर देण्याचे नियोजन करावाशीम : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर ः राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे...
ऊसबिलासाठी पीपीई किट घालून आंदोलन करणारसातारा : कारखान्यांना ऊस घातल्यानंतर १४...
पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण कृती...कोल्हापूर :  ‘‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण...
आघाडी सरकारकडून मराठा समाजाची घोर फसवणूकजळगाव ः देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना आम्ही...
लोहाऱ्यात वादळी पाऊसलोहारा, जि. उस्मानाबाद : शहरासह तालुक्यातील अनेक...
वाराईतून शेतकऱ्यांची लूटपुणे ः बाजार समित्यांमध्ये आवक झालेल्या...
खानदेशात पूर्वमोसमी पावसाचा धुमाकूळजळगाव ः खानदेशात पूर्वमोसमी पावसाचा गेले तीन दिवस...
नांदेड जिल्ह्यातील सोयाबीनची उत्पादकता...नांदेड : मागील खरीप हंगाम २०२०-२१ मधील...
महाराष्ट्रात बांबू क्रांती घडावी ः...लातूर ः गुजरातमध्ये ज्या प्रमाणे दुधाची क्रांती...
पिंपळगाव बसवंत येथे कांद्याची विक्रमी...नाशिक : उन्हाळ कांदा काढणीपश्चात साठवणूक क्षमता...