खानदेशात कांद्याच्या लागवडीत घट

जळगाव : खानदेशात कांदा लागवड घटली आहे. रोपवाटिकांचे अतिउष्णतेत झालेले नुकसान व महागडे बियाणे यामुळे कांदा लागवडीचे नियोजन कोलमडले आहे.
Decline in onion cultivation in Khandesh
Decline in onion cultivation in Khandesh

जळगाव : खानदेशात कांदा लागवड घटली आहे. रोपवाटिकांचे अतिउष्णतेत झालेले नुकसान व महागडे बियाणे यामुळे कांदा लागवडीचे नियोजन कोलमडले आहे. कांदा रोपे सद्यःस्थितीत खानदेशात अवपाद वगळता कुठेही उपलब्ध नाहीत. यामुळे लागवडीवर परिणाम  झाला आहे.

खानदेशात कांदा लागवड जवळपास पूर्ण झाली आहे. ही लागवड अपेक्षेपेक्षा निम्मीही झालेली नाही. जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ ते १२ हजार, धुळ्यात सात हजार आणि नंदुरबारातही दोन ते अडीच हजार हेक्टरमध्ये कांदा लागवड अपेक्षित होती. यंदा कांदा बियाणे महाग होते. जूनमध्ये कांदा रोपवाटिका तयार करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून केला.

बियाणे दोन ते अडीच हजार रुपये प्रतिकिलो या दरात मिळत होते. लागवडीचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केल्या. परंतु, जूनमध्ये १२ ते १२ दिवस आणि नंतर जुलैमध्येही १५ दिवस पावसाचा खंड होता. ऊन पडत होते. उष्णता प्रचंड वाढली. त्यात रोहित्राची नादुरुस्ती व इतर कारणांमुळे कांदा रोपवाटिकांमध्ये सिंचन करता आले नाही. रोपवाटिकांमध्ये कोवळ्या रोपांचे नुकसान झाले. काही रोपवाटिकांमध्ये बियाणे पेरल्यानंतर लागलीच अतिजोरदार पाऊस आला. त्यात बियाण्याची उगवण हवी तशी झाली नाही. रोपवाटिकांमध्ये विरळ रोपे असल्याने लागवडीचे नियोजनही कोलमडले. 

ज्यांनी दोन एकरात लागवडीचे नियोजन केले होते, ते फक्त अर्धा एकर लागवड करू शकत आहेत. यामुळे लागवड घटली आहे. जळगाव जिल्ह्यात फक्त सुमारे चार हजार, धुळ्यात तीन हजार, तर नंदुरबारात ५०० हेक्टरवर कांदा लागवड झाल्याचा अंदाज आहे.

कांदा रोपांसाठी शेतकरी अजूनही नाशिक, नगर, मध्य प्रदेशातील बडवानी, बऱ्हाणपूर भागात जात आहेत. अनेक शेतकरी गुजरातेतही जाऊन आले. कांदा रोपवाटिका व्यवसाय करणाऱ्यांना यंदा बऱ्यापैकी निधी मिळाला आहे. कारण रोपे महाग आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com