Agriculture news in marathi Decline in the price of purebred animals | Agrowon

जातीवंत खिल्लार जनावरांच्या किंमतीत घट 

राजकुमार चौगुले
गुरुवार, 22 जुलै 2021

चपळ असणाऱ्या खिलार बैलांचे संगोपन पशुपालकांसाठी अडचणीचे ठरत आहे. खिल्लार बैल सांभाळण्याचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. 

कोल्हापूर : चपळ असणाऱ्या खिलार बैलांचे संगोपन पशुपालकांसाठी अडचणीचे ठरत आहे. खिलार बैल सांभाळण्याचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. लॉकडाउनमुळे बाजार बंद व ग्राहक नसल्याने लाखो रुपयांचे बैलही काही हजार रुपयांत विकले जात आहेत. मशागतीसाठी बैलांचा वापर कमी होत असल्याने त्याचा ही फटका संगोपन कामावर होत आहे. 

कोरोनामुळे गेल्या वर्षापासून बैल बाजार बंद झाले आहेत. प्रत्येक आठवड्याला होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे या बैलांच्या खरेदी विक्रीची देवाण-घेवाण बंद झाली आहे. लॉकडाउनमुळे ग्राहक मिळत नसल्याने दर कमी झाले. प्रत्येक बाजारात आलेले खिलार बैल म्हणजे, त्या बाजाराची शानच. डौलदार बैलजोडी दाखवत त्याची वैशिष्ट्य सांगत बैलांची किंमत करणे व होसेने बैल खरेदी करणे हे पाहणे हा तर आनंदाचा क्षण. पण बाजार बंदमुळे हे सगळे चक्र थांबले. यात शर्यत बंदची ही भर पडली. त्यामुळे खिलार बैलाचे शौकीन नाराज झाले आहेत. 

चपळतेच्या बाबतीत सर्वोत्कृष्ट असणाऱ्या खिलार बैलाला बाजारात मोठी मागणी असते. या बैलांचा सांभाळ करणारा एक विशिष्ट वर्ग असल्याने जेवढा देखणा बैल तेवढी किंमत जास्त असते. अनेक जण एक वर्षापर्यंत वय असलेले खिल्लार खोंड विकत घेतात. त्याला परिपूर्ण आहार देऊन, मेहनत घेऊन त्याचा चपळ बैल तयार करतात. अगदी मनुष्यापेक्षा जास्त निगा या जनावरांची राखली जाते.

साधारणत: असे बैल संगोपन करण्यासाठी दररोज तीनशे ते चारशे रुपयांचे खाणे या बैलांना दिले जाते. सध्याच्या परिस्थितीमुळे देखभालीचा खर्च परवडत नसल्यामुळे अनेकांनी खिल्लार जनावरांची विक्री केली आहे. पशुपालकाकडे एकेकाळी ऐटदार जनावरांनी भरलेला गोठा आता सुना सुना भासत आहे. 

खिल्लार​ जोपासनेत घट 
बहुतांशी पशुपालक खिलार जनावरांची पैदास आपल्या गोठ्यात राहावी यासाठी देशी गाईचे पालन करीत. खिल्लार गायीला खोंड झाले, की अगदी अपत्यप्राप्तीचा आनंद पशुपालकाला व्हायचा. त्याची जोपासना करणे त्याला वाढवणे आणि चांगली किंमत आल्यास त्याची विक्री करणे असा नित्यक्रम पशुपालकांचा असायचा. पण मागणी नसल्याने पशुपालकांत नाराजी आहे. यामुळेच जातिवंत खिल्लारची जोपासना करणाऱ्या पशुपालकात घट होत असल्याची माहिती पशुपालकांनी दिली. 

प्रतिक्रिया
खिल्लार बैलांच्या जोपासणीत होणारी घट चिंताजनक आहे. माझ्याकडे सुमारे चाळीस खिलार बैल होते. पण जोपासना करणे अवघड झाल्याने त्याची विक्री केली. आता केवळ एक गाय गोठ्यात आहे. 
अतुल बाबर, गोपालक शेतकरी, विटा 

प्रतिक्रिया

आमच्याकडे परंपरागत बैलजोड्या होत्या. या बैलजोड्यांना मशागतीलाही मागणी नसल्याने खर्च परवडत नाही. त्यामुळे आम्ही बैल नाइलाजास्तव विकले. 

- अजय कदम, शेतकरी, इचलकरंजी 


इतर बातम्या
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...