चंद्रपूर जिल्ह्याच्या रब्बी पीककर्ज वितरणात घसरण

रब्बी हंगामातील पीककर्जाच्या वितरणाची टक्‍केवारी यंदा देखील घसरली आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात १५ कोटींपेक्षा जास्त पीककर्जाचे वाटप झाले होते. या वर्षी मात्र पीककर्ज अवघे ९ कोटींपर्यंतच झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या रब्बी पीककर्ज वितरणात घसरण Decline in rabbi peak loan distribution in Chandrapur district
चंद्रपूर जिल्ह्याच्या रब्बी पीककर्ज वितरणात घसरण Decline in rabbi peak loan distribution in Chandrapur district

चंद्रपूर : रब्बी हंगामातील पीककर्जाच्या वितरणाची टक्‍केवारी यंदा देखील घसरली आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात १५ कोटींपेक्षा जास्त पीककर्जाचे वाटप झाले होते. या वर्षी मात्र पीककर्ज अवघे ९ कोटींपर्यंतच झाले आहे. 

हंगामाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळाल्यास त्यांना हंगामाचे नियोजन करणे शक्‍य होते. मात्र या वेळी कोरोनामुळे शेती व्यवस्थापनात देखील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक शेतकऱ्यांची शेती पडीक राहिली. परिणामी, हंगामात पीककर्जाची टक्‍केवारी घसरल्याचे सांगितले जाते. 

गेल्या वर्षी खरीप हंगामात बॅंकांनी पीककर्ज वितरणाची प्रक्रिया हंगामाच्या दोन महिने आधीच सुरू केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील कर्ज प्रकरणातील त्रुटी दूर करता आल्या आणि सुलभरीत्या कर्जाची उपलब्धता झाली. यंदा मात्र तशाप्रकारचे धोरण राबविण्यात न आल्याने पीककर्जाची टक्‍केवारी घसरली आहे. 

कडधान्य क्षेत्र वाढले यंदा राजुरा, गोंडपिपरी, पोंभूर्णा, कोरपना, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, सावली, मूल तालुक्‍यांत कडधान्य लागवडीचे हेक्‍टरी प्रमाण वाढीस लागले आहे. ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर, सिंदेवाही हे तालुके भात उत्पादक आहेत.

१२० कोटींचे उद्दिष्ट कोरोनामुळे पीककर्ज मेळावे प्रशासनाला घेता आले नाही, असा दावा केला जात आहे. त्यामुळेच पीककर्ज गेल्या वर्षीच्या १५ कोटींवरून ९ कोटींपर्यंत खाली आल्याचे सांगितले जाते. जिल्ह्याचे पीककर्जाचे उद्दिष्ट १२० कोटी रुपयांचे आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com