परभणी, हिंगोली जिल्ह्यात ज्वारी, गहू, करडईच्या रब्बी पेरा क्षेत्रात घट

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या (२०२१-२२) रब्बी हंगामात शेतकऱ्यांची हरभऱ्याला अधिक पसंती आहे. शुक्रवार (ता.२६) पर्यंत या दोन जिल्ह्यांत हरभऱ्याची ९९ हजार ६८० हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारी, गहू, करडईच्या क्षेत्रात घट झाली आहे.
Decline in Rabbi Pera area of ​​sorghum, wheat, safflower in Parbhani, Hingoli district
Decline in Rabbi Pera area of ​​sorghum, wheat, safflower in Parbhani, Hingoli district

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या (२०२१-२२) रब्बी हंगामात शेतकऱ्यांची हरभऱ्याला अधिक पसंती आहे. शुक्रवार (ता.२६) पर्यंत या दोन जिल्ह्यांत हरभऱ्याची ९९ हजार ६८० हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारी, गहू, करडईच्या क्षेत्रात घट झाली आहे.

परभणी जिल्ह्यात रब्बीच्या सरासरी २ लाख १५ हजार ९६१ हेक्टरपैकी ९० हजार ५४४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची १ लाख १६ हजार ४१८ पैकी ३९ हजार ३६७ हेक्टरवर (३३.८२ टक्के), गव्हाची २८ हजार ५७० पैकी ७ हजार ४४ हेक्टरवर (२४.६६ टक्के), मक्याची २ हजार ६२८ पैकी ६९३ हेक्टरवर (२६.४ टक्के) पेरणी झाली. एकूण तृणधान्यांची १ लाख ४८ हजार ४२१ पैकी ४७ हजार २५५ हेक्टरवर (३१.८४ टक्के) पेरणी झाली.

हरभऱ्याची ६३ हजार ६६२ पैकी ४२ हजार ७६२ हेक्टरवर (६७.१७ टक्के), तर एकूण अन्नधान्याची २ लाख १२ हजार १२७ पैकी ९० हजार २१ हेक्टरवर (४२.४४ टक्के) पेरणी झाली. करडईची ३ हजार ५९३ पैकी ४८५ हेक्टरवर (१३.५१ टक्के), जवसाची ११६.३५ पैकी २१ हेक्टरवर (१८.०५), तिळाची १७.२  पैकी १२ हेक्टरवर, सूर्यफुलाची ४८.४ पैकी ४ हेक्टरवर (८.२६ टक्के) पेरणी झाली. एकूण गळितधान्यांची ३ हजार ८३३ पैकी ५२२ हेक्टरवर (१३.६४ टक्के) पेरणी झाली.

हिंगोली जिल्ह्यात सरासरी १ लाख २७  हजार ३३९ पैकी ६९ हजार ९०८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ज्वारीची १० हजार ४१४ पैकी ६ हजार ८३६ हेक्टरवर (६५.६४ टक्के), गव्हाची ३२ हजार ८७३ पैकी ५ हजार ६८९ हेक्टरवर (१७.३१ टक्के), मक्याची १ हजार ४८८ पैकी १५३ हेक्टरवर (१०.२८ टक्के), तर एकूण तृणधान्यांची ४५ हजार ६५१ पैकी १२ हजार ७३१ हेक्टरवर (२७.८९ टक्के) पेरणी झाली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com