Agriculture news in Marathi Decline in sugar prices in the world market | Agrowon

जागतिक बाजारात साखर दरात घट

राजकुमार चौगुले
गुरुवार, 24 जून 2021

ब्राझीलमध्ये जूनमध्ये झालेला पाऊस व भारतामध्ये गाळप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेले साखर उत्पादन या दोन्ही बाबीचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरामध्ये जवळपास ४० ते ५० डॉलरनी घट झाली. 

कोल्हापूर : जगातील सर्वांत जास्त साखर उत्पादन असणाऱ्या ब्राझीलमध्ये जूनमध्ये झालेला पाऊस व भारतामध्ये गाळप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेले साखर उत्पादन या दोन्ही बाबीचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरामध्ये जवळपास ४० ते ५० डॉलरनी घट झाली. 

गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत पहिल्यांदाच साखरेचे दर इतक्या खाली आले आहेत. बुधवारी (ता. २३) जागतिक बाजारात रिफाइन साखरेस टनास ४२३ डॉलर, तर कच्च्या साखरेचे दर १६ सेंट प्रति पौंड इतके होते. ८ जूनला रिफाइन साखरेचा दर ४६७ डॉलर होता. तर रिफाइन साखरेचा दर १७.८० सेंट प्रति पौंड होते. 

यंदा ब्राझीलमध्ये दुष्काळ असल्याने साखरेचे उत्पादन कमी होईल, असा अंदाज साखर उद्योगाने व्यक्त केला होता. तसेच इथेनॉलला ही मागणी वाढत असल्याने ब्राझील इथेनॉलकडे वाढणार असल्याने त्याचाही परिणाम साखरेच्या उत्पादनावर होईल, असे चित्र असल्याने दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढून होते. 

पावसाअभावी उसाची रखडलेली वाढ उत्पादन घटीस कारणीभूत ठरत असल्याने ब्राझीलमधून साखरेचा पुरवठा जागतिक बाजारात कमी होत होता. परंतु जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ब्राझीलमध्ये सरासरी १५ ते २० मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे नुकसानीत आलेल्या उसाला जीवदान मिळाले. हवामान विभागाने जून ते ऑगस्ट दरम्यान ब्राझीलमध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. जूनमध्ये याची सुरुवात झाल्याने ऊस पीक चांगले येईल, अशी अपेक्षा निर्माण झाली. यामुळे पुन्हा जागतिक बाजारात साखरेचे दर कमी झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

याबरोबर दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे भारतातील साखर हंगाम संपला आहे. गेल्या वर्षीपेक्षा सुमारे पस्तीस लाख टन साखर जादा उत्पादित झाली आहे. साखर निर्यातीचे करारही वेगात आहेत. भारतातून साखर जादा प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारात येईल या अपेक्षेने जागतिक बाजारांमध्ये दर कमी झाले आहेत. सुरुवातीच्या अंदाजामध्ये ब्राझीलमधून सत्तावीस लाख टन साखर पहिल्या काही महिन्यात बाजारात येईल, असा अंदाज होता. 

पावसाची शक्‍यता पाहता तीस लाख टनांहून अधिक साखर बाजारात येण्याचा अंदाज नव्याने वर्तविण्यात आला आहे. सध्या ब्राझीलमध्ये ३५ टक्के पर्यंत साखर हंगाम पूर्ण झाला आहे. जोपर्यंत ७० टक्क्यांपर्यंत तेथील साखर हंगाम पोहोचणार नाही तोपर्यंत जागतिक बाजारात साखरेची स्थिती कशी राहील याबाबत नेमका अंदाज व्यक्त करणे कठीण असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

सध्या जागतिक बाजारात साखरेचे दर कमी झाले असले तरी ते काहीच दिवस कमी राहतील, असा अंदाज व्यापारी सूत्रांचा आहे. ब्राझीलमध्ये जूनला पाऊस झाला असला तरी जुलै-ऑगस्टमध्ये पुरेसा पाऊस होईल याबाबत ठोस कुणी ही सांगू शकत नाही. ब्राझीलमधील काही कारखाने यंदाही खास इथेनॉल निर्मितीकडे वळले आहेत. याचा सकारात्मक परिणाम साखर उत्पादन घटण्यावर होईल व आंतरराष्ट्रीय बाजार ऑगस्टपर्यंत पुन्हा तेजीत येऊन दर स्थिर होतील, असा अंदाज निर्यातदार सूत्रांचा आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असणारी तेजी जूनच्या अंतिम टप्यात कमी झाली. सध्या जूनच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत रिफाइन साखरेचे दर ४० ते ५० डॉलरनी तर कच्या साखरेचे दर सरासरी २ सेंटनी कमी झाले आहेत. दरात घसरण झाली आहे पण ही घसरण फार काळ चालणार नाही, अशी आशा उद्योगाला आहे.
- अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार


इतर अॅग्रो विशेष
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
गुणवत्तापूर्ण आंब्याला मिळवली ग्राहक...मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर...
ट्रायकोडर्मा निर्मितीसाठी शेतात उभारली...राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा...
टिळा तेजाचामराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी...
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
‘जुनं ते सोनं' चा खोटेपणा "जुनी शेती खूप चांगली होती. त्या शेतीत खूप...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
शास्त्रीय उपकरणांद्वारे शेतीचे अचूक...कालच्या भागात आपण राहुल रसाळ यांच्या शेतीपद्धतीची...