Agriculture news in marathi Decline in vegetable imports in Pune | Page 2 ||| Agrowon

पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घट

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२०) भाजीपाल्याची सुमारे ८० ट्रक आवक झाली. 

पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२०) भाजीपाल्याची सुमारे ८० ट्रक आवक झाली. राज्याच्या विविध भागात सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे भाजीपाला भिजल्याने आवक घटली आहे.

प्रामुख्याने पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची स्थानिक आवक अत्यल्प झाली होती. तर, लातूर, बंगळूरू, हुबळी, बेळगाव येथून सुमारे दीड लाख जुड्या आवक झाली. आवक कमी झाल्याने पालेभाज्यांसह विविध भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली होती. यामध्ये कांदा, बटाटा, काकडी, मटार, हिरवी मिरची टोमॅटो यांचा समावेश होता. 

आवकेमध्ये परराज्यातून इंदौर येथून ७ टेम्पो गाजर, कर्नाटक गुजरात येथून ३ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, तामिळनाडु आणि गुजरात येथून १० टेम्पो हिरवी मिरची, तामिळनाडू येथून शेवगा सुमारे ४ टेम्पो, तर आग्रा आणि इंदौर येथून ३५ ट्रक बटाटा, तर गुजरात आणि मध्यप्रदेशातून लसणाची ८ ट्रक आवक झाली. 

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० गोणी, कोबी सुमारे ५ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, भेंडी १०, गवार ५, सिमला मिरची १० टेम्पो, हिरवी मिरची ३ टेम्पो, टोमॅटोची दीड हजार क्रेट आवक झाली. तर, भुईमुग सुमारे १०० गोणी, पारनेर पुरंदर येथून मटार अवघी सुमारे ५० गोणी, तांबडा भोपळा ८ टेम्पो, तर कांद्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली. तर, पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या सुमारे दीड लाख, तर मेथीच्या २० हजार जुड्यांची आवक झाली होती. 

कांद्याच्या दरात वाढ 

कांद्याची निर्यातंबंदी होऊन सुद्धा राज्यासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी कांदा भिजला आहे. परिणामी, या भागातून कांद्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पुणे बाजार समितीमध्ये रविवारी कांद्याला दहा किलोला २७० ते ३४० रुपये दर होता. हे दर गेल्या आठवड्यापेक्षा वाढले होते. तर, सततच्या पावसाने कांद्याची आवक अवघी सुमारे ५० ट्रक झाली होती. तर, मागणी देखील वाढल्याने दरात वाढ झाली.

फळभाज्यांचे १० किलोचे दर 

कांदा - २७०-३४०, बटाटा -२००-३००, लसूण - ६००-१२००, आले सातारी १५०-३००, भेंडी २५०-३००, गवार - गावरान, सुरती - ३५०-५००, टोमॅटो -३००-४००, दोडका ३००-४००, हिरवी मिरची - ३००-४५०, दुधी भोपळा - १५०-२००, चवळी - २००-२५०, काकडी -२००-३००, कारली हिरवी - २००-२५०, पांढरी -१५०-१६०, पापडी - २५०-३००, पडवळ -२००-२२०, फ्लॉवर १५०-२००, कोबी -१००-१६०, वांगी -२००-२५०, डिंगरी - २००-२५०, नवलकोल - १००-१२०, ढोबळी मिरची - २५०-३००, तोंडली- कळी २५०-३००, जाड -१००-१२०, शेवगा -५००-७००, गाजर - १५०-२००, वालवर - ३००-३५०, बीट १००-१२०, घेवडा -३००-४००, कोहळा १००-१२०, आर्वी -२००, घोसावळे १६०-२००, मटार स्थानिक - १४००- १५००, पावटा ३००-३५०, तांबडा भोपळा - ६०-१००, सुरण -१८०-२००, नारळ (शेकडा) १०००-१६००, मका कणीस (१० किलो) ६०-१००

पालेभाज्यांचे शेकड्याचे दर 

कोथिंबीर - ५००-१५००, मेथी १२००-१८००, शेपू ५००-११०० कांदापात १२००-२०००, चाकवत ५००-६००, करडई -८००-१०००, पुदिना - ३००-६००, अंबाडी -५००-८००, मुळे ८००-१२००, राजगिरा - ५००-६००, चुका १०००-१२००, चवळई -८००-१३००, पालक १५००-२००० 

फळांचा बाजार 

रविवारी (ता.२०) येथील फळबाजारात संत्री ६ टन तर मोसंबी सुमारे ५० टन, डाळिंब सुमारे १०० टन, पपई २५ टेम्पो, लिंबे ३ हजार गोणी, कलिंगड ५ टेम्पो, खरबुज ४ टेम्पो, सिताफळ १० टन, चिकु एक हजार तर पेरू सुमारे ५०० क्रेटस आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ३००-४००, मोसंबी : (३ डझन) : १२०-२८०, (४ डझन ) : ३०-१००, संत्रा : (३ डझन) : १००-२५० (४ डझन) - ३०-१००, डाळींब (प्रति किलोस) : भगवा : ४०-१००, गणेश : ४०-६० आरक्ता २०-५०. कलिंगड : ५-२०, खरबुज : १०-३०, पपई : ५-२०, सिताफळ - १०-१२०. पेरु (२० किलो क्रेट) - ३००-४५०.

फुलबाजार 

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे :  झेंडू : १०-२०, गुलछडी : १०-५०, सुट्टा कागडा - ६०-१००, कापरी : १०-३०, शेवंती : २०-५० (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : ३०-५०, लिलि बंडल : ६-१० जर्बेरा : ५-१५.

मटण मासळी 

गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता.२०) खोल समुद्रातील मासळीची सुमारे १२ टन, खाडीची आणि नदीची प्रत्येकी सुमारे ५०० किलो आवक झाली. तर, आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १४ टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. दरम्यान, मासळी, मटण चिकनला गेल्या आठवड्याच्या तुलनेत मागणी आणि दर ही स्थिर आहेत. तर, इंग्लिश अंड्याच्या शेकड्याच्या दरात १० रुपयांनी घट झाली आहे. गावरान अंड्याच्या दरात ४० ते ५० रुपयांनी घट झाली आहे. मटणाचे दर स्थिर आहेत.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) 

 पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे १४००, मध्यम : ७५०-८००, लहान ४८०- ५५०, भिला :  २८०-४००, हलवा : ४४०-४८०, सुरमई : ५५०, रावस : लहान ५५०,  मोठा : ७५०, घोळ : ५००, भिंग : ३००-४००, करली : २४०-३२०, करंदी : १४०-१६०, सोललेली ४००, पाला :  १०००-१४००, वाम :  ४८०-५५०, ओले बोंबील : १४०-२००.

 कोळंबी ः लहान २४०,  मध्यम ३२०-४००,०mothe ४८०, जंबोप्रॉन्स : १०००-१२८८,  किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १०००-१२००, मोरी : २८०, मांदेली : १६०, राणीमासा : २६०, खेकडे  : २४०, चिंबोर्‍या : ४८०. 
 खाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी : २८०, नगली : लहान ३२० मोठी ६२०, तांबोशी : ४८०, पालू : २००, लेपा : १४०-१६०,  शेवटे : २००, बांगडा : लहान २४० , मोठे२८०-३२०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०,  तिसर्‍या : २८०,  खुबे : १४०, तारली : १६० 

 नदीची मासळी : रहू : १६०, कतला : २००, मरळ : ४८० शिवडा : २८०, खवली : २८०, आम्ळी : १६०, खेकडे : २८० वाम : ५५०

 चिकन : चिकन : १८०, लेगपीस : २२० जिवंत कोंबडी : १४०, बोनलेस : २८०. 

 अंडी : गावरान : शेकडा : ७२० डझन : ९६ प्रति नग :८, इंग्लिश : शेकडा : ५५८ डझन : ७२ प्रतिनग : ६. 

    मटण : बोकडाचे : ६४० बोल्हाईचे : ६४० खिमा : ६४०, कलेजी : ६४०.


इतर ताज्या घडामोडी
काजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना...ही योजना काजू पीक विम्यासाठी अधिसूचित कोल्हापूर,...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
संरक्षित शेतीचे महत्त्वसंरक्षित शेतीमध्ये हरितगृह किंवा शेडनेटगृहाचा...
पोषक आहारासाठी बियाणे स्वावलंबन...येत्या काळात कमी पाण्यावर येणारी पिके बाजरी,...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
सांगली जिल्ह्यातील भाजीपाला पिके...सांगली ः सांगली जिल्ह्याची ओळख भाजीपाला...
सणासुदीत निष्काळजीपणा नको ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशातील लॉकडाउन संपला तरी कोरोनाचा...
कांदा बियाण्यांचा काळाबाजार सुरूचनाशिक : मागील वर्षी उन्हाळ कांदा बीजोत्पादनावेळी...
लाचखोर तलाठ्यास कारावासवर्धा : सातबारावरील चूक दुरुस्तीसाठी पंधरा...
‘गोकूळ’ देणार दूध संस्‍थांना दरफरकापोटी...कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध...
केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३०...मुंबई : कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक...
बिहारला मदत, मग महाराष्ट्राला का नाही?...मंगळवेढा, जि. सोलापूर : केंद्र शासनाने बिहारमध्ये...
शेतकऱ्यांशी सरकारला देणेघेणे नाही ः...करमाळा, जि. सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...
पिकांचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने...सोलापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला...
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७५ महसूल...सोलापूर :  जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा...
सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठावरील कृषिपंप...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली...
रत्नागिरीत भातशेतीवर अस्मानी संकटरत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार...
नाशिक जिल्ह्यात मका विक्रीत...येवला, जि. नाशिक : सध्या बाजार समित्यांसह खासगी...
नुकसानपातळी अधिक, केंद्रानेही मदत करावी...नाशिक : ‘‘परतीच्या पावसामुळे कापणी योग्य झालेली...
रिसोड तालुक्यात सोयाबीनची हेक्टरी अडीच...रिसोड, जि. वाशीम ः  सततच्या पावसाने सोयाबीन...