राज्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या घटत असताना आठ-पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत म
बाजारभाव बातम्या
खानदेशात मक्याची आवक कमी
जळगावः खानदेशात प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्याची आवक कमी झाली आहे. आवक कमी असली तरी दरावर दबाव आहे. सध्या प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर आहे.
जळगावः खानदेशात प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्याची आवक कमी झाली आहे. आवक कमी असली तरी दरावर दबाव आहे. सध्या प्रतिक्विंटल १००० ते १२०० रुपये दर आहे.
शासकीय खरेदी गेल्या महिन्याच्या अखेरीस बंद झाली. खरेदी बंद होताच दरावर दबाव वाढला. शेतकऱ्यांना शासकीय केंद्रात १८५० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव मिळत होता. शासकीय खरेदी सुरू होती, त्या वेळेस बाजारातील दर ११०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. जामनेर, चाळीसगाव, चोपडा भागात मक्याची शिवार खरेदीदेखील सुरू होती. परंतु शासकीय खरेदी बंद होताच बाजारातील दरही कमी झाले. शिवार खरेदी मंदावली.
शिवार खरेदी सध्या बंदावस्थेत आहे. अनेक शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी बंद झाल्यानंतर बाजारात मक्याची विक्री केली. तर काहींनी घरात साठवणूक केली आहे. शासकीय खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, दोंडाईचा (ता.शिंदखेडा) येथील बाजारात मक्याची आवक कमी झाली आहे. जळगाव, चोपडा, अमळनेर येथील बाजारात डिसेंबरमध्ये मिळून सरासरी प्रतिदिन पाच हजार क्विंटल मक्याची आवक झाली.
या महिन्यात पहिल्या आठवड्यात जळगाव, चोपडा येथील आवक प्रतिदिन सरासरी मिळून ८०० क्विंटल एवढी झाली आहे.
खरेदी लवकर सुरू करा
अमळनेर येथेही सध्या प्रतिदिन १००० क्विंटल मक्याची आवक सुरू आहे. तर दोंडाईचा येथेही आवकेवर परिणाम झाल्याची माहिती मिळाली. बाजारात मक्याचे दर परवडणारे नाहीत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शासकीय खरेदी लवकर सुरू करावी. त्यासाठी स्थानिक खासदार, आमदार यांनी पुढाकार घेऊन काम करावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
- 1 of 67
- ››