ऊस उत्पादनात एकरी २० ते २५ टनांपर्यंत घट

ऊस उत्पादनात एकरी २० ते २५ टनांपर्यंत घट
ऊस उत्पादनात एकरी २० ते २५ टनांपर्यंत घट

पुणे ः साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होताच पावसाने फिरवलेली पाठ, दुष्काळी परिस्थिती आणि हुमणी अळीचा उसावर झालेल्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील बहुतांशी भागात ऊस उत्पादनात घट झाली आहे. एकरी २० ते २५ टनापर्यंत घट झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटका बसल्याचे चित्र आहे.  

गेल्या दीड महिन्यापासून पुणे जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. सध्या हंगाम वेगात सुरू आहे. यंदा गाळपासाठी येत असलेल्या उसाच्या फायबरमध्ये पाण्याअभावी वाढ झाली असून, बाहेरून मोठ्या दिसणाऱ्या उसाचे प्रत्यक्षात अपेक्षित वजन भरत नाही. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत एकरी २० ते २५ टनाचा फटका या वर्षी ऊस उत्पादनात बसत असल्याचे दिसून येत आहे. तसेच वर्षी नवीन लागवड केलेल्या व काळ्या कसदार जमिनीसह खोडवा पिकांवर व हलक्या स्वरूपाच्या जमिनीत हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत असून ऊस शेतीला चांगलीच घरघर लागल्याने ऊस उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.

जिल्ह्यात सर्वच भागात पावसाने पाठ फिरवल्याने व गेल्या दीड ते दोन महिने राहिलेल्या ढगाळ हवामान व हुमणी अळीसह कीड व इतर रोगांनी उसाचे मोठे नुकसान केले आहे. ऊस पट्टयात कांदा, मका, सोयाबीनवर देखील रोग किडीचा प्रादुर्भाव झाला होता. हुमणी अळीने थैमान घातल्याने शेतकरी चांगलेच हातघाईस आले. ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

याविषयी बाभूळसर (ता. शिरूर) येथील रामचंद्र नागवडे म्हणाले की, ‘माझ्याकडे वीस एकर ऊस आहे. त्यापैकी ११ एकर ऊस घोडगंगा साखर कारखान्याला गाळपासाठी गेला आहे. यंदा एकरी सरासरी ५० ते ५५ टन उसाचे उत्पादन मिळेल. गेल्या वर्षी ७० ते ८० टनापर्यंत उत्पादन मिळत होते. यंदा हुमणी अळी व कमी पावसामुळे सुमारे १५ ते २० टनापर्यंत उत्पादनात घट येत आहे.’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com