हिंगोली जिल्ह्यात कपाशी, तूर, ज्वारीच्या उत्पादकतेत घट

हिंगोली जिल्ह्यात कपाशी, तूर, ज्वारीच्या उत्पादकतेत घट
हिंगोली जिल्ह्यात कपाशी, तूर, ज्वारीच्या उत्पादकतेत घट

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप हंगामातील कपाशी, तूर, ज्वारी या पिकांची प्रतिहेक्टरी उत्पादकता सरासरी उत्पादकतेपेक्षा कमी तर मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची उत्पादकता सरासरी उत्पादकतेपेक्षा अधिक आली आहे. येत्या खरीप हंगामात (२०१९-२०) सोयाबीनची उत्पादकता प्रतिहेक्टरी १४ क्विंटल ५० किलो, तुरीची उत्पादकता प्रतिहेक्टरी ८ क्विंटल, कपाशीची प्रतिहेक्टरी ५ क्विंटल ८० किलो एवढी प्रस्तावित करण्यात आली आहे.

२०१८-१९ च्या खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यात ६ हजार १३९ हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आली होती. ज्वारीची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ५ क्विटंल ७० किलो असताना प्रत्यक्षात ४ क्विंटल १० किलो आली. येत्या खरीप हंगामात ज्वारीची प्रतिहेक्टरी उत्पादकता ६ क्विंटल एवढी प्रस्तावित करण्यात आली. कपाशीची ४६ हजार २८२ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. कपाशीची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ७ क्विंटल ५१ किलो असताना प्रत्यक्षात सरासरी प्रतिहेक्टरी १ क्विंटल ७५ किलो उत्पादन मिळाले. 

येत्या खरिपात ४३ हजार ६८९ हेक्टरवर कपाशीच्या लागवडीचा अंदाज असून प्रतिहेक्टरी सरासरी ५ क्विंटल ८० किलो उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली आहे. तुरीची ४१ हजार ६० हेक्टरवर पेरणी झाली होती. तुरीची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी ६ क्विंटल २० किलो असताना प्रत्यक्षात ४ क्विंटल ६ किलो एवढी आली. येत्या खरिपात तुरीची ४३ हजार ११० हेक्टरवर पेरणीचे नियोजन असून प्रतिहेक्टरी ८ क्विंटल उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली आहे.

मुगाची ८ हजार ४६० हेक्टरवर पेरणी झाली होती. मुगाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी २ क्विंटल ९८ किलो असताना प्रत्यक्षात ६ क्विंटल ६८ किलो एवढी आली. येत्या हंगामात मुगाची ८ हजार ६० हेक्टरवर पेरणीचा अंदाज आहे. तर प्रतिहेक्टरी ७ क्विंटल २५ किलो उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली आहे. उडदाची ६ हजार ५०३ हेक्टरवर पेरणी झाली होती. उडदाची प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता ३ क्विंटल ३५ किलो असतांना प्रत्यक्षात ७ क्विंटल १४ किलो आली.

येत्या खरिपात उडदाची ७ हजार ३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. प्रतिहेक्टरी ७ क्विंटल ५० किलो एवढी उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली आहे. सोयाबीनची २ लाख ३६ हजार ६२९ हेक्टरवर पेरणी झाली होती. सोयाबीची सरासरी प्रतिहेक्टरी उत्पादकता ७ क्विंटल ८३ किलो असताना प्रत्यक्षात १३ क्विंटल ७९ किलो एवढी आली. येत्या खरिपात सोयाबीनची २ लाख ३६ हजार ८२९ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित असून प्रतिहेक्टरी १४ क्विंटल ५० किलो एवढी उत्पादकता प्रस्तावित करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com