Agriculture news in marathi Decrease in the discharge of ‘Jayakwadi’ | Agrowon

‘जायकवाडी’तील विसर्गात घट

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. शनिवारी (ता. १९) दुपारी एक ते दीड वाजेदरम्यान त्याच्या उघडलेल्या दरवाजांची उंची कमी करून विसर्ग घटविण्यात आला.

औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. शनिवारी (ता. १९) दुपारी एक ते दीड वाजेदरम्यान त्याच्या उघडलेल्या दरवाजांची उंची कमी करून विसर्ग घटविण्यात आला. धरणाच्या विविध दरवाजांमधून ४७ हजार १६० क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या पात्रात सुरू होता.

सातत्याने सुरू असलेल्या आवकेमुळे शुक्रवारी(ता.१८) सकाळी सहा वाजता जायकवाडी प्रकल्पातून ९४ हजार ३२० क्‍युसेकने गोदावरीच्या पात्रात विसर्ग सुरू होता. त्यावेळी जायकवाडी प्रकल्पात ३७ हजार ६६२ क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

शुक्रवारी सायंकाळी सहा ते साडे सहा वाजण्याच्या सुमारास जायकवाडीचे चार फूट उंचीने उघडण्यात आलेले १८ दरवाजे साडेतीन फूट केले गेले. नऊ हजार ४३२ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे त्यावेळी ६६ हजार चोवीस क्‍युसेकने विसर्ग गोदावरीच्या पात्रात सुरू होता. 

शनिवारी सकाळी सहा वाजता जायकवाडीत ५७ हजार २१४ क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू होती. त्यावेळी जायकवाडीतील एकूण पाणीसाठा २८६०.००८६ दलघमी, तर उपयुक्त पाणीसाठा २१२१.९०२ दलघमी इतका होता.

उपयुक्त पाणीसाठा ९७.७४ टक्के असलेल्या जायकवाडी प्रकल्पातून उजव्या कालव्याद्वारे १०० क्युसेकने, तर दरवाजांमधून ५६ हजार ५९२ क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता, अशी माहिती जायकवाडी प्रकल्प प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.


इतर ताज्या घडामोडी
चढ्या दराने कांदा बियाणे विक्री पडली...नाशिक : सध्या कांद्याच्या बियाण्यांचा मोठ्या...
केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ‘बोनस’...नवी दिल्ली : कोरोनासंकटामुळे महागाई भत्ता...
कृषी क्षेत्रात ‘पंदेकृवि’ची भरीव...अकोला ः कृषी विद्यापीठाने कृषी क्रांतीचे प्रणेते...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ः मुख्यमंत्री...उस्मानाबाद : खचून जाऊ नका, धीर धरा, शासन पूर्ण...
सरकारची शेतकऱ्यांना कोरडी आश्‍वासने :...जिंतूर, जि. परभणी, हिंगोली ः अतिवृष्टीमुळे...
एकनाथ खडसे उद्या ‘राष्ट्रवादी’तमुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या...
नगर जिल्ह्यात पिकांचे ६३ हजार हेक्टरवर...नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या...
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये...
सातारा जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टर...सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील...
वर्धा जिल्ह्यात यंदा ६४ टक्के पीक...वर्धा  :  कर्जमाफी आणि शासनाच्या...
कासोळा फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता...यवतमाळ :  शेतकऱ्यांच्या विविध...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांची छाटणी...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे...
रत्नागिरीत सप्टेंबरमध्ये ३४ हेक्टर...रत्नागिरी ः मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात...
जळगाव जिल्ह्यात मुबलक पाणीजळगाव :  जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व...
इगतपुरी तालुक्यात पावसामुळे २८५२...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या...
चिखलीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ‘रयत’...बुलडाणा : चिखली तालुक्यातील पळसखेडा जयंती फाटा ते...
नांदेड जिल्ह्यात ओल्या दुष्काळासाठी...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपासह बागायती...
कांदा बीजोत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि...
सरकारने नाकर्तेपणा दाखवू नये : दरकेर सोलापूर ः राज्य सरकार पंचनाम्याशिवाय मदत...
द्राक्ष पीक : पावसामुळे उद्भवलेल्या...सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, सर्व द्राक्ष...