कोल्हापुरात धरणांच्या विसर्गात घट

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर बहुतांशी ठिकाणी ओसरला आहे. गुरुवारी (ता.२०) संपलेल्या चोवीस तासात गगनबावड्यात सर्वाधिक ३५ मि मि. पावसाची नोंद झाली.
Decrease in discharge of dams in Kolhapur
Decrease in discharge of dams in Kolhapur

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर बहुतांशी ठिकाणी ओसरला आहे. गुरुवारी (ता.२०) संपलेल्या चोवीस तासात गगनबावड्यात सर्वाधिक ३५ मि मि. पावसाची नोंद झाली. पंचगंगेसह अन्य नद्यांच्या पाण्याच्या पातळीही झपाट्याने घट होत आहे. राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत. धरणांतून १४०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

जिल्ह्यातील ७१ बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीची पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ दुपारी बारा वाजता ४० फुट ६ इंच इतकी होती. वारणा धरणातील विसर्ग २२२९ क्यूसेक पर्यत कमी केल्याने वारणा नदीच्या पातळीतही घट झाली. 

कोयना धरणांतूनही फक्त ११ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने कृष्णा नदीच्या पातळीतही दोन दिवसात सुमारे चार फुटांनी घट झाल्याने महापुराचा धोका तूर्त तरी टळल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  अलमटी धरणांतून अडीच लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग गुरुवारीही कायम राहिला.

दुधगंगा धरणाचा विसर्ग ३६०० क्यूसेक करण्यात आल्याने दूधगंगा नदीची पातळी झपाट्याने कमी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पश्चिमेकडील तालुक्यात अंतराअंतराने होणाऱ्या मध्यम स्वरुपाच्या सरी वगळता जिल्ह्यात अन्य ठिकाणी केवळ ढगाळ हवामान आहे. 

गुरुवारी (ता.२०) दिवसभरही हीच स्थिती आहे. धरणक्षेत्रातही केवळ हलक्या सरी होत आहेत. यामुळे धरणांतील पाण्याची वाढ मंदगतीने होत आहे. पाऊस थांबल्याने गरजेइतकाच विसर्ग नद्यांच्या पात्रात सुरु असल्याने पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com