Agriculture news in Marathi Decrease in gram sowing area in Pune region | Agrowon

पुणे विभागात हरभरा पेरणी क्षेत्रात घट

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

पुणे ः बदलत्या हवामानामुळे अनेक शेतकऱ्यांनी उशिराने हरभऱ्याची पेरणी केली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत दोन लाख १७ हजार २२४ हेक्टरपैकी एक लाख ७८ हजार ४१० हेक्टर म्हणजेच ८२ टक्के पेरणी झाली आहे. अजूनही सुमारे ३८ हजार ८१० हेक्टर क्षेत्र पेरणीपासून दूर राहिले आहे. त्यातच किडी रोगाच्या प्रादुर्भावामुळे हरभऱ्याच्या उत्पादनात २० ते ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

पुणे ः बदलत्या हवामानामुळे अनेक शेतकऱ्यांनी उशिराने हरभऱ्याची पेरणी केली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत दोन लाख १७ हजार २२४ हेक्टरपैकी एक लाख ७८ हजार ४१० हेक्टर म्हणजेच ८२ टक्के पेरणी झाली आहे. अजूनही सुमारे ३८ हजार ८१० हेक्टर क्षेत्र पेरणीपासून दूर राहिले आहे. त्यातच किडी रोगाच्या प्रादुर्भावामुळे हरभऱ्याच्या उत्पादनात २० ते ३० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

पुणे विभागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विजय, विशाल यासारख्या वाणाच्या हरभऱ्यांची पेरणी केली होती. यंदा हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीककर्ज घेऊन रब्बीची तयारी केली होती. अनेकांनी खते, बियाणांची खरेदी वेळेवर केली होती. परंतु यंदा पुरेसा पाऊस झाला असला तरी वेळेवर वाफसा न झाल्याने अनेकांनी उशिराने पेरण्या केल्या. काही ठिकाणी सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही. परिणामी, विभागात जवळपास ३८ हजार ८१० हेक्टर क्षेत्र पेरणीपासून वंचित राहिले आहे.

पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकांची पेरणी केली. परंतु, कोरडवाहू भागात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे विहिरी कोरड्या पडू लागल्याने पिकांना पाणी देण्यास अडचणी तयार झाल्या आहेत. त्यामुळे पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय पाणीटंचाईमुळे कोरडवाहू भागात पुरेशा प्रमाणात हरभऱ्याच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. त्याचा परिणामही उत्पादनावर होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांमधून बोलले जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
जालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी...
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट...नाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३...
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दहा लाख...परभणी  ः महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नाशिक जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमननाशिक : जिल्ह्यात जुलैअखेर पावसाने उघडीप...
पिंपळनेरला कांदा मार्केट सुरू करापिंपळनेर, जि.धुळे  : पिंपळनेर (ता.साक्री)...
शासकीय मका खरेदी बंदमुळे शेतकऱ्यांना...भडगाव, जि. जळगाव  : शासकीय मका खरेदिला...
बार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ...मळेगाव, जि. सोलापूर  ः दीड वर्षांपूर्वी भीषण...
पावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या...सध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी...
धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...
आणखी तीन सोयाबीन बियाणे कंपन्यांविरुद्ध...अकोला : या हंगामासाठी बाजारपेठेत आणलेले...
नगर जिल्ह्यातील पॉलिहाउसधारक बेदखलनगर ः जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने नगर...
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणमागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...