agriculture news in marathi, Decrease in the Incoming of white onion | Agrowon

जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घट
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील पाच-सहा दिवसांत लाल कांद्याची सरासरी ११०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान २५० व कमाल ८०० रुपयांपर्यंतचे दर मिळाले. पांढऱ्या कांद्याची आवक कमी होऊन ती प्रतिदिन २०० क्विंटलवर आली.  

पांढऱ्या कांद्यासही किमान ३०० व कमाल ९०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. दरात फारशी सुधारणा मागील १०-१२ दिवसांत झाली नाही. परंतु दरात पडझडही झाली नाही. जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची काढणी सुरू आहे. चोपडा, पाचोरा, जळगाव, यावल, चाळीसगाव, भागात काढणी सुरू आहे. काही शेतकरी काढणी करून लागलीच कांदा विक्रीसाठी बाजारात आणत आहेत.

पुणे, नगर व औरंगाबाद जिल्ह्यातूनही लाल कांद्याची आवक होत आहे. पांढऱ्या कांद्याची आवक औरंगाबादमधील सिल्लोड, सोयगाव व जालना येथून होत आहे. लाल कांद्याची आवक स्थिर आहे. काढणी वेगात सुरू होईल, तशी पुढील महिन्यात आवक वाढू शकते. जळगावप्रमाणेच चाळीसगाव, अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल) येथील बाजारातही आवक स्थिर आहे.

उन्हाळ कांद्याची लागवड जिल्ह्यात कमी झाली. यामुळे पुढेही आवक प्रतिदिन २५०० क्विंटलपेक्षा अधिक राहणार नाही, असा अंदाज आहे. पुणे, नगर भागातील कांद्याची आवक आणखी १५ ते २० दिवस सुरू राहील. मे अखेरीस ती कमी होईल, असे सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...