परभणी जिल्ह्यात कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज

परभणी जिल्ह्यात कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज
परभणी जिल्ह्यात कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज

परभणी : ‘‘जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ९ हजार ५०० हेक्टर आहे. परंतु यंदा १ लाख ९५ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड नियोजित आहे. त्यासाठी विविध कंपन्यांकडे बियाण्यांची मागणी करण्यात आली. मंगळवारपर्यंत ३ लाख ८३ हजार ६६७ पाकिटे उपलब्ध झाली आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी दिली.

ममदे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ५ लाख २९ हजार ५४२ हेक्टरवर पेरणी नियोजित आहे. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे. मंगळवार (ता. ४) पर्यंत विविध खरीप पिकांचे ४२ हजार ३५३ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले.‘‘

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील विविध पिकांचे ५ लाख २९ हजार ५४२ हेक्टर क्षेत्र नियोजित आहे. यामध्ये सोयाबीन २ हजार ५० हजार, कापूस १ लाख ९५ हजार, तूर ४५ हजार, मूग २२ हजार, उडीद ९ हजार, तीळ ३००, ज्वारी ५ हजार, बाजरी ५००, भात १०, मका ६०० आणि अन्य पिकांची २ हजार १३२ हेक्टरवर पेरणी नियोजित आहे. 

जिल्ह्यात सोयबीनचे सरासरी क्षेत्र ८८ हजार ६७० हेक्टर आहे. विविध पिकांच्या नियोजित पेरणी क्षेत्रानुसार सार्वजनिक बियाणे उत्पादक कंपन्यांकडे ५५ हजार २३८ क्विंटल, तर खासगी कंपन्यांकडे ४१ हजार ७९८ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली.

मंगळवारपर्यंत सोयाबीनचे एकूण ३८ हजार १८७ क्विंटल, तुरीचे ५२४ क्विंटल, मुगाचे १६७ क्विंटल, उडदाचे २१ क्विंटल, ज्वारीचे १ लाख ७२७ क्विंटल, अन्य १ हजार ७२६ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com