नांदुरा तालुक्यात दुधाळ जनावरांमध्ये घट

नांदुरा तालुक्यात दुधाळ जनावरांमध्ये घट
नांदुरा तालुक्यात दुधाळ जनावरांमध्ये घट

नांदुरा, जि. बुलडाणा  : जिल्ह्यात दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या नांदुरा तालुक्यातील धवलक्रांतीला मागील काही वर्षांपासून घरघर लागली आहे. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे पशुधनात घट आली असून, याची झळ तालुक्यातील खवा व्यवसायालाही सोसावी लागत आहे. अशीच स्थिती राहिली, तर दुधाअभावी खव्याचा व्यवसाय या भागातून हद्दपार होणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांत नांदुरा तालुक्यात दूध व्यवसाय बहरला होता. त्यामुळे जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली. प्रत्येक गावातील संकलित केले गेलेले दूध हे सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्हा दूध संघाला पुरविले जायचे. त्यासाठी नांदुऱ्यात जिल्ह्यातील सर्वात मोठे प्रशस्त इमारतीसह व यंत्रसामग्रीसह शासकीय दूध शीतकरण केंद्र कार्यरत होते.  सोबतच मोठ्या प्रमाणात दूध गावोगावी उपलब्ध होत असल्याने अर्धेअधिक गावातील शेतकऱ्यांनी शेतीला जोड धंदा म्हणून खवानिर्मिती सुरू केली. हा व्यवसाय वाढत गेला. शुद्ध खव्याची ही परंपरा महाराष्ट्रासह शेजारील राज्यात पोचल्याने नांदुऱ्याचा शुद्ध खवा सर्वांनाच हवाहवासा वाटत होता. मात्र, हाच खवा आज रोजी दूध मिळत नसल्याने संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. सततचा दुष्काळ यासाठी कारणीभूत असून, दुधाळात जनावरांना चारा मिळत नसल्याने ही जनावरे घटली आहेत. नांदुरा तालुक्यात १९ व्या पशुगणनेनुसार ९५५७२  एवढे पशुधन असून, यात देशी गाई २५५६५, संकरित गाई ६६३३ तर म्हैसवर्गाची जनावरे ९०२० होते. नुकतीच विसावी पशुगणना झाली असून त्याची आकडेवारी बाहेर यायची आहे. गेल्या सहा सात वर्षांत पशुधनात खास करून दुधाळ जनावरांत मोठी घट झाली आहे. ही घट तालुक्यासाठी खरोखरच चिंतनाचा विषय असला, तरी शासनाकडून याबाबत ठोस उपाययोजना कुठेच दिसून येत नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com