Agriculture news in marathi; Decrease in milk production in Nandura taluka | Page 2 ||| Agrowon

नांदुरा तालुक्यात दुधाळ जनावरांमध्ये घट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

नांदुरा, जि. बुलडाणा  : जिल्ह्यात दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या नांदुरा तालुक्यातील धवलक्रांतीला मागील काही वर्षांपासून घरघर लागली आहे. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे पशुधनात घट आली असून, याची झळ तालुक्यातील खवा व्यवसायालाही सोसावी लागत आहे. अशीच स्थिती राहिली, तर दुधाअभावी खव्याचा व्यवसाय या भागातून हद्दपार होणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नांदुरा, जि. बुलडाणा  : जिल्ह्यात दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या नांदुरा तालुक्यातील धवलक्रांतीला मागील काही वर्षांपासून घरघर लागली आहे. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे पशुधनात घट आली असून, याची झळ तालुक्यातील खवा व्यवसायालाही सोसावी लागत आहे. अशीच स्थिती राहिली, तर दुधाअभावी खव्याचा व्यवसाय या भागातून हद्दपार होणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मागील काही वर्षांत नांदुरा तालुक्यात दूध व्यवसाय बहरला होता. त्यामुळे जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली. प्रत्येक गावातील संकलित केले गेलेले दूध हे सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्हा दूध संघाला पुरविले जायचे. त्यासाठी नांदुऱ्यात जिल्ह्यातील सर्वात मोठे प्रशस्त इमारतीसह व यंत्रसामग्रीसह शासकीय दूध शीतकरण केंद्र कार्यरत होते. 

सोबतच मोठ्या प्रमाणात दूध गावोगावी उपलब्ध होत असल्याने अर्धेअधिक गावातील शेतकऱ्यांनी शेतीला जोड धंदा म्हणून खवानिर्मिती सुरू केली. हा व्यवसाय वाढत गेला. शुद्ध खव्याची ही परंपरा महाराष्ट्रासह शेजारील राज्यात पोचल्याने नांदुऱ्याचा शुद्ध खवा सर्वांनाच हवाहवासा वाटत होता. मात्र, हाच खवा आज रोजी दूध मिळत नसल्याने संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. सततचा दुष्काळ यासाठी कारणीभूत असून, दुधाळात जनावरांना चारा मिळत नसल्याने ही जनावरे घटली आहेत.

नांदुरा तालुक्यात १९ व्या पशुगणनेनुसार ९५५७२  एवढे पशुधन असून, यात देशी गाई २५५६५, संकरित गाई ६६३३ तर म्हैसवर्गाची जनावरे ९०२० होते. नुकतीच विसावी पशुगणना झाली असून त्याची आकडेवारी बाहेर यायची आहे. गेल्या सहा सात वर्षांत पशुधनात खास करून दुधाळ जनावरांत मोठी घट झाली आहे. ही घट तालुक्यासाठी खरोखरच चिंतनाचा विषय असला, तरी शासनाकडून याबाबत ठोस उपाययोजना कुठेच दिसून येत नाही.

 

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...मुंबई ः राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदाची...
भारत 'या' देशाला देणार कापूस...नागपूर ः मुस्लिम बहूल असलेल्या अझरबैजान देशातील...
कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरची...नाशिक : परराज्यांत होणाऱ्या कांद्याच्या...
हमीभाव खरेदी केंद्रावर आली वजनकाटे...अकोला ः शासनाने या हंगामात सुरु केलेल्या आधारभूत...
मराठवाड्यात रब्बी पेरणीला मिळेना गती लातूर : मराठवाड्यातील रब्बी पेरणीची गती...
परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत...
अरुणा प्रकल्पग्रस्तांनी मांडले...सिंधुदुर्ग : आयुक्त कार्यालयावर ‘दे धडक बेधडक’...
पाण्याच्या निचऱ्यासाठी गादीवाफ्यावर धान...भंडारा ः‘पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा...
अस्मानीमुळे नुकसान सोसवेना, चालविली...नाशिक : अगदी प्रतिकूल परिस्थितीत भांडवल जमा करून...
अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे...नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर...
पुणे जिल्हा परिषदेत येणार ‘महिला राज’पुणे  : जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष...
पुणे बाजार समितीत रताळ्यांची २० टन आवक...पुणे  ःकार्तिकी एकादशीनिमित्ताने पुणे बाजार...
कशामुळे घटले साताऱ्यातील स्ट्राॅबेरीचे...सातारा  ः जिल्ह्यात अतिपावसाचा फटका...
साताऱ्यात पुढील वर्षी सहकारी संस्थांची...सातारा  : आगामी वर्ष हे सहकारातील विविध...
नगर जिल्हा परिषदेतही वाहताहेत...नगर ः राज्यात एकीकडे भाजपला सत्तेपासून दूर...
थकीत पीकविम्यासाठी किसान सभेचा पुण्यात...पुणे  ः बीडमधील शेतकऱ्यांना थकीत पीकविम्याची...
किसान सभेचे सोमवारपासून राज्यभर आंदोलन...पुणे  ः अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. या...
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र...मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर...
भारतीय मक्याचे पुढे काय होते ? जाणून...मका हे एक महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील चार...
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...