Agriculture news in marathi, Decrease in number of tankers due to rainfall in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या संख्येत घट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

सोलापूर  : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर यंदा शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील विविध भागांत पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे ६०० वरून आता टॅंकरची संख्या १३४ एवढी झाली आहे. मात्र, करमाळ्यात सर्वाधिक ४५ टॅंकरद्वारे ४३ गावे अन्‌ ३५४ वाड्या-वस्त्यांना, तर माढ्यात ३० टॅंकरद्वारे २४ गावे व २९ वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. 

सोलापूर  : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर यंदा शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील विविध भागांत पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे ६०० वरून आता टॅंकरची संख्या १३४ एवढी झाली आहे. मात्र, करमाळ्यात सर्वाधिक ४५ टॅंकरद्वारे ४३ गावे अन्‌ ३५४ वाड्या-वस्त्यांना, तर माढ्यात ३० टॅंकरद्वारे २४ गावे व २९ वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. 

जिल्ह्यात मागच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी पातळीत मोठी घट झाली. विहिरी, कूपनलिका कोरड्या असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करून जिल्हाभर आवश्‍यक त्या ठिकाणी टॅंकर सुरू केले. 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने सुमारे ४०० टॅंकर कमी झाले. जिल्ह्यात सद्य:स्थितीत एकूण टॅंकर १३४  सुरू आहेत. त्यात १२१ गावांना पाणीपुरवठा होतो आहे. त्यात टॅंकर असलेल्या वाड्या-वस्त्यांची संख्या ४१९ इतकी आहे. सद्य:स्थितीत उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्‍यांत प्रत्येकी १९, दक्षिण सोलापुरात १५, अक्‍कलकोट येथे एक, माढ्यात ३०, करमाळ्यात ४५, तर मोहोळ तालुक्‍यात पाच टॅंकर सुरू असल्याची माहिती टंचाई शाखेकडून देण्यात आली. 

मागच्या वर्षीचा टंचाई आराखडा सुमारे ३७ कोटींचा असतानाही चार ते पाच कोटींचा अतिरिक्‍त खर्च झाला आहे. त्यामुळे आगामी टंचाई आराखडा वाढीव रकमेचा असेल, असा अंदाजही व्यक्‍त करण्यात आला.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९९ टक्‍क्‍...सातारा ः जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी; तसेत...
परभणी जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये...परभणी ः दोन वर्षांच्या खंडानंतर परभणी जिल्ह्यात...
‘स्वाभिमानी’चे ठिय्या आंदोलन सुरू  सातारा ः जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना...
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सव्वापाच टक्के...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी...
पुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे...पुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी...
जालना : निर्यातक्षम द्राक्षांच्या...जालना : निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी...
लडाखला उभारणार सेंद्रिय शेती संशोधन...पुणे ः विविध शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनावर...
नगर जिल्ह्यामध्ये २४१ वैयक्तिक पाणी...नगर ः वीस दिवस सतत पाऊस पडल्याने पाणीपातळी वाढली...
शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात ! नगर : मनमाड-दौंड रेल्वेरुळाला विळद-देहरे गावच्या...
अतिपावसाने नगरमधील शेतजमिनी चिबडल्यानगर  : अतिपावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले...
नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवरील...नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या...
वर्धा जिल्ह्यातील ६०० हेक्‍टरवरील ...वर्धा  ः जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे...
दक्षिण महाराष्ट्रातील साखर...कोल्हापूर  : दक्षिण महाराष्ट्रात पावसाने...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळ...नाशिक  : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
ऊसतोड कामगारांच्या रोजगारावर होणार...नगर ः गतवर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले....
वऱ्हाडातील प्रकल्प तुडुंबअकोला  ः गेल्या महिन्यात सतत झालेल्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांवर धाडीनाशिक  : देशभरात कांद्याचा साठा संपुष्टात...
पीक व्यवस्थापन सल्ला सध्या मोठ्या प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दरातही...नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत नव्या सोयाबीनची...
जळगाव बाजारात केळीची आवक रखडतजळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक रखडतच सुरू असून,...